‘work order’ ; हदगाव शहरातील लाखो रुपयांची रस्त्यांची कामे नियोजनाशिवाय ‘वर्क ऑर्डर’च्या विरोधात
हदगाव | हदगाव शहरातील नगरपरिषदेच्या विविध प्रभागां मध्ये,न.पा प्रशासन आणि सा. बां. हदगांव विभागाने केलेल्या रस्त्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता स्पष्टपणे दिसून येत आहे. ज्या प्रभागांमध्ये या कामांची आवश्यकता होती, तिथे न करता, अनावश्यक ठिकाणी कोणतेही नियोजन न करता केवळ कंत्राटदारांचा फायदा कसा होईल यावर भर देण्यात आला आहे.हदगाव शहरातील अनेक सिमेंट रस्ते काही आठवड्यांतच उखडले, तर काही रस्ते अवघ्या सहा महिन्यांतच खराब झाले. या मुद्द्यावर शहरवासियां सह विविध आणि सामाजिक संघटनांनी जोरदार आवाज उठवला आहे. तरी सुद्धा नगरपरिषद प्रशासन याकडे "आर्थिक" स्वार्थातून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. या दुर्लक्षित भूमिकेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
'सावधान' बॅनरद्वारे नागरिकांचा संताप नगरपरिषदेच्या दुर्लक्षाने त्रस्त झालेल्या काही जागरूक नागरिकांनी शहराच्या ...
