नांदेडकरियर

Mahesh Vaddakka ; इस्त्रोच्या भूमीतून भरारीचे पंख घेऊन परता : महेश वडदकर

नांदेड | भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्त्रो ही देशाची अंतराळ संशोधनातील महत्त्वाची संस्था असून या ठिकाणावरून आकाशात भरारी घ्यायचे पंख आणि त्यासाठी लागणारे बळ घेऊन परत या, अशा शब्दांमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी विद्यार्थ्यांना आज शुभेच्छा दिल्या. समाज कल्याण विभागातील 60 गुणी विद्यार्थ्यांची एक टीम शैक्षणिक सहलीसाठी श्रीहरिकोटा येथे आज रवाना झाली.

समाज कल्याण सहाय्यक आयुक्त नांदेड कार्यालय अधिनस्त शासकिय निवासी शाळेतील विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी इस्त्रो येथे विमानाने रवाना झाले. त्यांना निरोप देताना श्रीहरीकोटा येथे आपण शैक्षणिक सहलीसाठी जातो आहे आणि त्या ठिकाणावरून नांदेडसाठी येतांना मोठ्या स्वप्नाची भरारी घेऊन येतो आहे, हे लक्षात ठेवावे असे मार्गदर्शन यावेळी त्यांनी केले.

WhatsApp Image 2025 04 16 at 6.41.21 PM 3 Mahesh Vaddakka ; इस्त्रोच्या भूमीतून भरारीचे पंख घेऊन परता : महेश वडदकर

यावेळी सहायक आयुक्त समाज कल्याण शिवानंद मिनगिरे यांनी या विद्यार्थ्यांपैकी काहींनी आंतराळशास्त्र सारख्या विभागात काम केल्यास मला आनंदच होईल. हा एक प्रशिक्षण दौरा असून विद्यार्थ्यांना नव्या क्षेत्रातील भरारी देण्यासाठी राज्य शासनाने आयोजित केला आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. श्री. मिनगिरे यांच्या मार्गदर्शनात हा कल्पक अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द मुला-मुलींची शासकीय निवासी शाळा, माहूर, हदगाव, उमरी, नायगाव येथील प्रत्येकी शाळा 15 विद्यार्थी-विद्यार्थीनी असे एकूण 60 विद्यार्थी व त्यांचे काळजीवाहक म्हणुन सोबत शिक्षक, कर्मचारी हे सदर शैक्षणिक सहलीसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) श्रीहरीकोटा येथे 16 ते 19 एप्रिल 2025 या कालावधी जात आहेत.

WhatsApp Image 2025 04 16 at 6.41.22 PM 1 Mahesh Vaddakka ; इस्त्रोच्या भूमीतून भरारीचे पंख घेऊन परता : महेश वडदकर

यावेळी समाज कल्याण अधिकारी विलास केंद्रे, सेवानिवृत्त समाज कल्याण अधिकारी बापू दासरी हे उपस्थित होते. हे विद्यार्थी हैद्राबाद येथून विमानाने जाणार आहेत. त्यांना आज हैद्राबादला बसने रवाना करण्यात आले. अधिकाऱ्यांनी हिरवी झेंडी दाखवून सहलीस रवाना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांपटवार यांनी केले तर आभार रामदास पेंडकर यांनी मानले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!