मुखेड| शेतकऱ्याच्या बचत खात्याला होल्ड लाऊन शासकीय मदतीची रक्कम कपात करणाऱ्या सर्व बँक शाखा व्यवस्थापक विरुद्ध नियमानुसार प्राधिकरणा मार्फत तात्काळ कारवाई करा. अशी मागणी बालाजी पाटील ढोसणे यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.


नांदेड जिल्ह्यासह मुखेड तालुक्यात शेतकरी मायबापाच्या बचत खात्याला होल्ड करण्याचे प्रमाण वाढले असून शेतकऱ्याचे बचत खाते होल्ड करणाऱ्या बँक शाखा व्यवस्थापक विरुद्ध नियमानुसार प्राधिकरणा मार्फत तात्काळ कारवाई करावी अशी मागणी शेतकरी पुत्र संघर्ष समितीचे बालाजी पाटील ढोसणे यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन केली.


सध्याला प्रधानमंत्री आवास योजनेतून व अन्य योजनेतून घरकुलांचे कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत.त्यांचे हफ्ते जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणे मार्फत थेट लाभार्थ्याच्या खात्यावर टाकणे सुरु आहे.पिक विम्याचे पैसे,दुष्काळी अनुदान,लाडकी बहिण योजनेचे पैसे व अन्य शासनाचे योजनेचे पैसे थेट खात्यावर पडत असल्यास पिक कर्जाचे कारण देऊन स्टेट बँक ऑफ इंडिया,महाराष्ट्र ग्रामीण,बँक,बँक ऑफ इंडिया,बँक ऑफ बडोदा,सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया व सर्व राष्ट्रीयकृत बँकेत शेतकऱ्याची अडवणूक होत आहे.


याकडे जिल्हाधिकारी साहेबांनी लक्ष देऊन सर्व बँकचे शाखाधिकारी यांना शासकीय मदतीला होल्ड न करण्याचे नव्याने परिपत्रक काढून शेतकऱ्यांना न्याय द्यावा व होल्ड केलेल्या बँक शाखा व्यवस्थापक विरुद्ध नियमानुसार प्राधिकरणा मार्फत तात्काळ कारवाई करावी जर बँक प्रशासनाने होल्ड काढले नाही तर २०२१ साली मुखेड मध्ये शेतकऱ्यांचा उद्रेक झाला त्याची पुनरावृत्ती होईल व येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन होईल असा इशारा शेतकरी पुत्र संघर्ष समितीचे बालाजी पाटील ढोसणे, रमाकांत पाटील जाहुरकर,निळकंठ पाटील कोळनुरकर यांनी केली.



