Balaji Patil Dhosane : शेतकऱ्याच्या खात्याला लावलेला होल्ड काढा – बालाजी पाटील ढोसणे यांची मागणी
मुखेड| शेतकऱ्याच्या बचत खात्याला होल्ड लाऊन शासकीय मदतीची रक्कम कपात करणाऱ्या सर्व बँक शाखा व्यवस्थापक विरुद्ध नियमानुसार प्राधिकरणा मार्फत तात्काळ कारवाई करा. अशी मागणी बालाजी पाटील ढोसणे यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.
नांदेड जिल्ह्यासह मुखेड तालुक्यात शेतकरी मायबापाच्या बचत खात्याला होल्ड करण्याचे प्रमाण वाढले असून शेतकऱ्याचे बचत खाते होल्ड करणाऱ्या बँक शाखा व्यवस्थापक विरुद्ध नियमानुसार प्राधिकरणा मार्फत तात्काळ कारवाई करावी अशी मागणी शेतकरी पुत्र संघर्ष समितीचे बालाजी पाटील ढोसणे यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन केली.
सध्याला प्रधानमंत्री आवास योजनेतून व अन्य योजनेतून घरकुलांचे कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत.त्यांचे हफ्ते जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणे मार्फत थेट लाभार्थ्याच्या खात्यावर टाकणे सुरु आहे.पिक विम्याचे पैसे,दुष...
