वडेपुरी/लोहा| माता रत्नेश्वरी देवीची पालखी रविवारी रत्नेश्वरी देवीचा अभिषेक करून माता रत्नेश्वर देवीच्या पादुका प्रतिमासह निघणार असुन, ती पालखी वडेपुरी नगरीमध्ये दाखल होईल. वडेपुरी येथून श्रावण मासातील पहिला सोमवार या दिवशी गावातून मिरवणूक सह विष्णुपुरी येथील काळेश्वराच्या मंदिराच्या दर्शनासाठी जाणार आहे.


मागील आठ वर्षापासून ही परंपरा चालू असून, या वर्षाची ही नववी यात्रा आहे. गावचे गुरुघर भारती परिवार त्यातील प्रल्हाद महाराज भारती यांच्या कल्पनेतून पालखी दिंडी गेली नऊ वर्षापासून चालू आहे. त्यांना रत्नेश्वरी विश्वास मंडळ आणि संपूर्ण गावकऱ्यांची साथ आहे. या पालखीचे स्वागत जानापुरी स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल येथे प्रथम होईल. पुढे जानापुरी गाव, वाडीपाटी, नानक सर, विष्णुपुरी विद्यापीठ, विष्णुपुरी गाव, अशा अनेक ठिकाणी पालखीचे स्वागत व चहापाण्याची व्यवस्था करण्यात येत असते.


या पालखीमध्ये वडेपुरी गावासह पंचक्रोशीतील जानापुरी, खरबी, बामणी, टेळकी, कीवळा, डेरला ,झरी, सोनखेड, इतर गावांचा समावेश असतो. मोठ्या हरिनामाच्या गजरात ही पालखी विष्णुपुरीच्या काळेश्वर मंदिराची दर्शनासाठी येत असते. यामध्ये प्रामुख्याने प्रल्हाद भारती महाराज, शंकर भारती महाराज, भगवान भारती महाराज, आनंद भारती महाराज, सतीश भारती, वीरेंद्र भारती, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष शिवाजी पाटील दळवे, सचिव साहेबराव झांबरे, सदाशिव अंबुरे, सदाशिव स्वामी, तसेच शिवाजी बोडके, चांदोजी दळवे, लक्ष्मण बोडके, गंगाधर पांचाळ मोठ्या प्रमाणात गावातील मंडळी महिला सह उपस्थित असतात.




