नांदेड/मुखेड| मुखेड तालुक्यातील ग्रामीण (कला, वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय,वसंतनगर (कोटग्याळ) ता. मुखेड जि. नांदेड, सांस्कृतिक विभागाच्या वतीने तालुकास्तरीय गीत गायन स्पर्धेचे आयोजन गुरुवार दि.२४ आक्टोंबर २०२४ रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये मुखेड तालुक्यातील सर्व महाविद्यालयातील व उच्च माध्यमिक विद्यालयातील स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. हरिदास राठोड तर उद्घघाटक म्हणून माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य मा. दिलीप गायकवाड होते. उद्घाटनपर भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता असते व विद्यार्थ्यांनी अशा कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे सांगितले तर अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. हरिदास राठोड सरांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेकरिता स्पर्धकास शुभेच्छा दिल्या व सुप्रसिद्ध गायक मन्नाडे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रा. संजय पाटील व प्रा.डॉ. गुरूनाथ कल्याण यांनी केले तर प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ. महेश पेंटेवार यांनी केले व आभार प्रा.डॉ.शिल्पा शेंडगे यांनी व्यक्त केले. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु. स्वामी माहेश्वरी ओंकार बी.ए. द्वितीय वर्ष, शाहीर अण्णाभाऊ साठे महाविद्यालय मुखेड हिने पटकावला तर द्वितीय व तृतीय क्रमांक ग्रामीण (कला, वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय वसंतनगरचा विद्यार्थी जोशी कृष्णा रमेश बी.ए. द्वितीय वर्ष व राठोड शिवम राजु बी.एस्सी. प्रथम यांनी पटकावला.
या स्पर्धेतील गुणवंताना प्रमाणपत्र व रोख रक्कम प्रथम १०००, द्वितीय ७००, व तृतीय ५०० देउन सन्मानित करण्यात आले. प्राचार्य डॉ.हरिदास राठोड, उपप्राचार्य अरुणकुमार थोरवे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा.डॉ.बळीराम राठोड, प्रसिद्धी प्रमुख प्रा.डॉ. रामकृष्ण बदने, नॅकचे समन्वयक प्रा.डॉ. उमाकांत पदमवार यांनी सर्व स्पर्धक व विजेत्यांना शुभेच्छा दिल्या. सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.डॉ.महेश पेंटेवार, प्रा.डॉ. गुरूनाथ कल्याण, प्रा.डॉ. सखाराम गोरे, प्रा.डॉ.शिल्पा शेंडगे, प्रा.संजय पाटील, प्रा.डॉ. महेंद्र होनवडजकर,परिक्षक मा. व्यंकटराव हंगरगे, मा. ऋषिकेश पाटील बेळीकर, मा. जयपाल मठपती व सर्व सहभागी स्पर्धक यांच्या प्रयत्नामुळे गीत गायन स्पर्धा यशस्वीपणे पार पडली.