song singing competition : ग्रामीण महाविद्यालयात रंगली गीत गायन स्पर्धा -NNL
नांदेड/मुखेड| मुखेड तालुक्यातील ग्रामीण (कला, वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय,वसंतनगर (कोटग्याळ) ता. मुखेड जि. नांदेड, सांस्कृतिक विभागाच्या वतीने तालुकास्तरीय गीत गायन स्पर्धेचे आयोजन गुरुवार दि.२४ आक्टोंबर २०२४ रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये मुखेड तालुक्यातील सर्व महाविद्यालयातील व उच्च माध्यमिक विद्यालयातील स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. हरिदास राठोड तर उद्घघाटक म्हणून माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य मा. दिलीप गायकवाड होते. उद्घाटनपर भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता असते व विद्यार्थ्यांनी अशा कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे सांगितले तर अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. हरिदास राठोड सरांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेकरिता स्पर्धकास शुभेच्छा दिल्या व सु...
