नांदेड| नव्याने शहर पोलीस उपअधीक्षक (SDPO) पदाची जबाबदारी स्वीकारलेल्या रामेश्वर व्येनंजने यांनी आज पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांची तसेच पो.उप.महा. शाहजी उमाप यांची भेट घेतली. उद्यापासून ते प्रत्यक्ष कामकाज सुरू करणार आहेत.


त्यांचा मुख्य टार्गेट – शहरातील सर्व अवैध धंदे (गुटखा, मटका, क्लब, मसाज सेंटर आदी) पूर्णतः बंद करणे. गुन्हेगारांविरुद्ध ठोस कारवाई, वारंवार गुन्हे करणाऱ्यांना तडीपार करणे. नवीन योजना आखून क्राईम नियंत्रणात ठेवणे आदी असून, व्येनंजने यांनी सांगितले की, आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखणे प्राधान्याने केले जाईल. शहर पोलीस ठाण्यातील तक्रारी व त्यावरील निवारणाची पाहणी स्वतः करतील.


तसेच, पोलीस स्टेशन आवारात ड्रेसवर कोणी तंबाखू/गुटखा सेवन करताना दिसल्यास त्यांना स्पष्टीकरण विचारले जाईल. कामचुकार कर्मचाऱ्यांना नोटीस देण्याची कार्यवाहीही होईल. लवकरच मीटिंग घेऊन शहरातील स्थितीचा आढावा घेऊन सर्वकाही सुरळीत करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.




