नांदेड। येथील जानकीनगर हनुमानगड भागात साकारत असलेली राजमाता जिजाऊ सृष्टी ही येणार्या कित्येक पिढ्यांना इतिहासाची साक्ष देत राहील, असा विश्वास राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी राजमाता जिजाऊ यांच्या ३५० व्या स्मृतिदिनानिमित्त जिजाऊ सृष्टी येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात व्यक्त केला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे हे ३५० वे वर्षे आहे. महाराजांच्या राज्याभिषेकानंतर अवघ्या बाराव्या दिवशी राजमाता जिजाऊ मॉंसाहेब यांचे निधन झाले. यावर्षी त्यांचा ३५० वा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने नांदेड येथे अतिशय भव्य स्वरूपात राजमाता जिजाऊ यांचा इतिहास उलगडून दाखवणारी व जिजाऊंच्या इतिहासाला न्याय देणारी जिजाऊ सृष्टी जानकीनगर, हनुमान गड नांदेड येथे पूर्णत्वास येत आहे. राजमाता जिजाऊ यांच्या ३५० व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी, सहकार, वैद्यकीय, सेवा, कला, क्रीडा, साहित्य या क्षेत्रातील अनेकांची तथा सर्व सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्यांची