नांदेडलाइफस्टाइल

जिल्ह्यातील सर्व शासकीय इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम अनिवार्य -मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल – NNL

नांदेड, अनिल मादसवार| जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी जिल्ह्यातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी जिल्‍हा परिषदे अंतर्गत सर्व शासकीय इमारतींमध्‍ये रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम अनिवार्य करण्‍याचे असे आवाहन केले आहे.

20x10

पावसाच्या पाण्याचे संकलन आणि संवर्धन करणे काळाची गरज आहे. शाळा खोली बांधकाम, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्‍य केंद्र, उप केंद्र, पशुवैद्यकिय दवाखाने आदी शासकीय इमारतीचे बांधकाम करतांना यापूर्वी रेनवॉटर हार्वेस्टिंग करणे ऐच्छिक होते. परंतू आता सर्व शासकीय इमारत बांधकामात रेनवॉटर हार्वेस्टिंग अनिवार्य करण्‍यात आले आहे.

Chidrawar

जिल्ह्यातील सर्व शासकीय इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टीमची स्थापना केली जाईल. यासाठी बांधकाम विभागाचे अभियंता आवश्यक ते तांत्रिक मार्गदर्शन करणार आहेत. नांदेड, भोकर व देगलूर बांधकाम उप विभागात प्राथमिक आरोग्‍य केंद्र, उप केंद्र, पशु वैद्यकिय दवाखाने, अंगणवाडी व शाळा खोली बांधकाम असे एकूण 209 इमारतीच्‍या कामांचे अंदाजपत्रक तयार आहेत. या अंदाज पत्रकात रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्‍टीम अंतर्भूत करण्‍यात आली आहे.

Saai

पावसाचे पाणी संकलन करून पर्यावरण संरक्षणासह पाणीटंचाई कमी करणे तसेच भूजल पातळी वाढविण्‍यासाठी जिल्‍हा परिषदेच्‍या सर्व इमारत बांधकाम करातांना तसेच पंधराव वित्‍त आयोगातील इमारत बांधकाम व सभागृह बांधकाम इमारतींना रेनवॉटर हार्वेस्टिंक सिस्‍टीम बसवावे, असे आवाहन मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे.

nnlmarathi.com

Is Most Popular Marathi News Website from Nanded (India). We not only break news या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि लेखक, वार्ताहर, पत्रकार, संबंधित जाहिरातदारांची आहे. यास NNLMARATHIन्यूजचे प्रकाशक, संचालक/संपादक, मालक यांची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती, मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. यावरून काही वाद-विवाद निर्माण झाल्यास ते हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविले जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!