कृषीनांदेडमुंबईराजकीय

Damage due to rain including storm : हदगाव-हिमायतनगर तालुक्यात तुफान वादळासह पावसामुळे केळी, ऊस, पपई बागायती शेतीचे नुकसान

नांदेड, अनिल मादसवार| हदगाव-हिमायतनगर मतदार संघात दि. 09/06/2025 रोजी तुफान वारा वादळासह अवकाळी पावसामुळे झालेल्या केळी, ऊस, पपई यासह बागायती शेतीचे नुकसान भरपाई मिळण्याकरिता तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली आहे.

दि.09/06/2025 रोजी सायंकाळी हदगाव व हिमायतनगर तालुक्यांमध्ये अचानकपणे तुफान वादळ वाऱ्यांसह अवकाळी पावस झाला. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे, त्यात केळी, ऊस, पपई यासह बागायती असलेल्या शेतीचे मोठ्या प्रमाणात झाले. पिके जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.

सदर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून, उदरनिर्वाहाचे मुख्य साधन असलेल्या केळीच्या पिकाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शासन स्तरावरून तातडीने मदतीची आवश्यकता आहे. म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेऊन निवडत देत, संबंधित महसूल व कृषी विभागामार्फत तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत वितरित करण्यात यावी अशी विनंती केली आहे.

आमदार बाबुराव कदम कोहळीकर साहेब यांनी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी निवेदनाची तात्काळ दखल घेत नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांना नांदेड जिल्ह्यातील व हदगाव हिमायतनगर तालुक्यातील सर्व केळी, ऊस, पिकांची पाहणी करून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्याची अपेक्षा आहे. तर अनेक शेतकऱ्यांचे टिनशेड उडून गेले तर काही शेतकऱ्यांची जनावरे जखमी झाली तर गोरगरिबांची घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली अनेकांचे सेन्सर उघड्यावर आले आहे. या नुकसानीचे देखील पंचनामे करून भरपाई मिळावी अशी रास्ता अपेक्षा नुकसानग्रस्त व्यक्त करत आहेत.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button