Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक
  • गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन
  • Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना
  • Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड
  • CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार
  • नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Rainfall : राज्यातील विविध भागांमध्ये २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान पावसात वाढ अपेक्षित
नांदेड महाराष्ट्र मुंबई September 25, 2025

Rainfall : राज्यातील विविध भागांमध्ये २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान पावसात वाढ अपेक्षित

NNL TeamBy NNL TeamSeptember 25, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

विविध भागांमध्ये पावसात वाढ आणि काही भागांमध्ये मुसळधार पाऊस अपेक्षित असल्यामुळे शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत. दक्षिण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासह कोकणातील घाट परिसरात नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे

मुंबई| बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, आणि त्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात किमान ५ ऑक्टोबरपर्यंत तरी मान्सून निरोप घेण्याची शक्यता नाही.

२६ तारखेला दक्षिण विदर्भ आणि लगतच्या मराठवाड्यात दुपारनंतर ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होऊ शकते. यात गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यांचा समावेश आहे. उर्वरित विदर्भ आणि मराठवाड्यात आभाळी हवामान आणि हलका पाऊस पडू शकतो.

२६ तारखेच्या तुलनेत २७ आणि २८ रोजी राज्यात पावसाच्या प्रमाणात आणि क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज आहे. २७ तारखेला दक्षिण मराठवाड्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यात नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांचा समावेश आहे. उर्वरित मराठवाड्यात देखील पावसात वाढ होऊ शकते, ज्यामुळे या भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. याच बरोबर दक्षिण विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील काही भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो, तर उर्वरित विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा लगतचे मध्य महाराष्ट्रातील जिल्हे, सोलापूर, येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पाडण्याचे संकेत आहेत. या दिवशी खानदेशात प्रामुख्याने हलका पाऊस पडू शकतो. 

२८ तारखेला इतर भागांच्या तुलनेत पावसाचा जोर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अधिक राहण्याची शक्यता आहे. या दिवशी अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. याच बरोबर मुंबई महानगरात (मुंबई शहर, ठाणे आणि पालघर जिल्हे) पाऊस अपेक्षित आहे, काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याचे संकेत आहेत. पश्चिम विदर्भ, पश्चिम मराठवाडा आणि खानदेशात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे, तर उर्वरित विदर्भात प्रामुख्याने हलका पाऊस पडू शकतो.

शेतकऱ्यांनी हवामानाच्या या अंदाजानुसार शेतीचे नियोजन करावे. काढणी केलेली पिके पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावीत, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. दक्षिण मराठवाडा; कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरातील धरण साठ्यात वाढ होऊन नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.

of the state between September 26 and 28 Rainfall is expected to increase in various parts
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleIndira Gandhi School ; इंदिरा गांधी शाळेत पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी
Next Article Police Recruitment : पोलीस भरतीच्या उमेदवारांना सरावासाठी मिळणार मैदाने खा.. अशोकराव चव्हाण यांचा पुढाकार
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Corruption in various development works in Ekamba : १५ व्या वित्त आयोगाच्या निधीसह एकंबा गावात विविध विकासकामात भ्रष्टाचार

January 26, 2025

Devendra Fadnavis : धर्मादाय आयुक्त विभागाचे कामकाज लोकाभिमुख – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -NNL

October 2, 2024

लोकसभेत ‘पॅलेस्टाईन’च्या विजयाच्या घोषणा देणार्‍या असदुद्दीन ओवैसी यांची खासदारकी रहित करा ! – ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त ठराव – NNL

June 26, 2024

Dhanegaon ; धनेगाव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबीरास ऊत्सफुर्त प्रतिसाद

July 24, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Minister Zirwal ; मंत्री झिरवळांचा साधेपणा इस्लापूर येथे ताफा थांबवून साध्या दुकानात केली दाढी

Chief Minister : मुख्यमंत्री महोदयाच्या व स्थानिक आमदाराच्या माध्यमातून सर्वसामाजिक हिताचे प्रश्न सोडवू

Bike rider killed : अज्ञात वाहनाच्या धडकेत बाईक स्वार जागीच ठार…!

Godjevan day : वडगावात गोडजेवनाच्या दिवशी नाती, नातू व मुलीचा स्तुत्य उपक्रम -NNL

Rameshwar Venanj : शहर पोलीस उपअधीक्षक नांदेड पदावर रामेश्वर व्येनंजने रुजू

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?