नांदेड| दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभागाने दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी विनातिकीट प्रवाशांची तपासणी करून रेल्वेत फुकट प्रवास करणाऱ्यांचा चांगलाच दणका दिला आहे. या मोठा धडक तपास मोहिमेत एकाच दिवसात 366 जणांवर कारवाई करण्यात आली आहे!


लिंबगाव स्थानक आणि परभणी–मुदखेड–हिमायतनगर या रेल्वे सेक्शनमध्ये विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर धडक तपासणी मोहीम राबवली. यामध्ये अनियमित व विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात आली.


या अभियानाचे नेतृत्व सहायक वाणिज्य व्यवस्थापक एन. सुब्बाराव यांनी केलं असून, विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. जे. विजय कृष्णा आणि विभागीय वाणिज्य व्यवस्थापक श्री ऋतेश यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण कारवाई पार पडली.



हि कार्यवाही यशस्वी करण्यासाठी मोठा मनुष्यबळ सहभाग करून घेण्यात आला होता. त्यात 15 तिकीट तपासनीस, 4 वाणिज्य विभाग कर्मचारी, RPF पथक एकूण 14 गाड्यांमध्ये सखोल तपासणी करण्यात आली असून, तपासात धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहे. रेल्वेतून विनातिकीट व अनियमित प्रवाशांची संख्या ३६६ आढळून आली असून, त्यांच्याकडून अंदाजे रक्कम : ₹1,76,315/- रुपयाचा दंड वसूल केलं आहे. हि कारवाई विनातिकीट प्रवास रोखणे, अनधिकृत फेरीवाल्यांवर अंकुश, कायद्याचा धाक निर्माण करणे आणि प्रामाणिक प्रवाशांचे संरक्षण व सुविधा देणे हि होती.

या धडक कार्यवाहीस रेल्वे प्रशासनाचे इशारा दिला कि, प्रवाश्यांची “वैध तिकिटाशिवाय प्रवास करू नये. भविष्यातही अशा मोहिमा ठराविक अंतराने राबवल्या जाणार आहेत. नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई निश्चित होणार आहे.” “तिकिट घ्या, नियम पाळा आणि त्रास टाळा!” असे आवाहन नांदेड विभागातील सर्व प्रवाशांना रेल्वे प्रशासनाचे केले आहे.


