नांदेड | नांदेड जिल्ह्यातील मौजे निळा (ता. लोहा) परिसरात अवैध गांजा शेती करणाऱ्या आरोपीवर स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी धडक कारवाई करत ₹1 लाख 94 हजार 800 इतक्या किमतीचा 19 किलो 480 ग्रॅम गांजा जप्त केला आहे.


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार दिनांक 04 डिसेंबर 2025 रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, निळा येथील शिवाजी गणपती डांगे (वय 40, व्यवसाय शेती) हा कापसाच्या शेतामध्ये लपवून गांजाची अवैध लागवड व विक्री करीत आहे. तत्काळ पथकाने शिवारात छापा टाकला असता मोठ्या प्रमाणात तयार गांजा आढळला. आरोपीला घटनास्थळीच ताब्यात घेण्यात आले.


याबाबत सोनखेड पोलीस ठाण्यात कलम 20(B)II(B), 22 NDPS Act अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक साईनाथ पुयड व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. वरिष्ठांनी पथकाच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.




