मुंबई/नांदेड| नांदेड जिल्ह्यातील वरवट येथील शेतमजूर महिला आपली मुलगी व पुतणीसह घरी परत येत असताना पुरात वाहून गेल्याने तिघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबातील सदस्य दुःखाच्या सावटात अडकले असून, त्यांना शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदार संघाचे आ. बाबुराव कदम कोहळीकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.


हदगाव तालुक्यातील मौजे वरवट येथील सौ. अरुणा बळवंत शकरगे वय ३५ कु. दुर्गा बळवंत शकरगे वय १० कु. समिक्षा विजय शकरगे वय ७ ह्या शेतामध्ये हळद लागवड करण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान झालेल्या दोन तास ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे नाल्याला पूर आहे. अचानक आलेल्या पाण्याचा प्रवाह वाहून जाऊन तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील महिला व लहान २ मुली मृत्युमुखी पडल्यामुळे या कुटुंबावर दुःखाचे संकट कोसळला आहे. तर संपूर्ण परिसर दुःखाच्या सावटाखाली आला आहे.



सदर कुटुंब उघड्यावर पडल असून, या दुर्घटनाग्रस्त कुटुंबाला तात्काळ शासनाकडून आधार मिळावा यासाठी आर्थिक मदत देण्यात यावी. अशी आस्थेवाईक मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आमदार बाबुराव कदम यांनी निवेदनाद्वारे केली आहे. मागणीची दाखल घेत तात्काळ जिल्हाधिकारी यांना सूचना देत अतिवृष्टीने एकाच वेळी घडलेल्या घटनेसंबंधी आर्थिक मदत मंजुरीसंदर्भात कार्यवाही करण्याचे सांगितले आहे. या यावेळी त्यांच्यासोबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख विवेक देशमुख व अनेक शिवसैनिक उपस्थित होते.




