देगलुर/नांदेड| बांगलादेशवाशियाकडून हिंदूवरील वाढत असलेला अन्याय अत्याचार तात्काळ थांबला पाहिजे यासाठी देगलूर येथील सकल हिंदू समाजाच्यावतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात सकल हिंदू बांधव न् मोर्चामध्ये सहभागी झाले होते.
गेल्या अनेक महिन्यापासून बांगलादेशमध्ये हिंदू वरील अन्याय अत्याचारामध्ये वाढ झालेली आहे . हिंदू जनजागृती करणारे चिन्मय स्वामी महाराज यांचा छळ करून त्यांना डांबून ठेवले आहे . महिलांवर अत्याचार वाढले आहेत . हा सर्व प्रकार थांबला पाहिजे यासाठी मंगळवार दिनांक १० डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता हनुमान मंदिर कापड बाजार ते शहरातील मुख्य रस्त्यावरून मोर्चा उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला तदनंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले यावेळी सोमलिंग शिवाचार्य महाराज बिचकुंदेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
मोर्चामध्ये प्रामुख्याने एक हे तो सेफ है, एकही नारा एकही नाम जयश्रीराम जयश्रीराम, बांगला देशातील अत्याचार थांबला पाहिजे, वंदे मातरम, हिंदूवरिल अन्याय थांबलाच पाहिजे, भारत माता की जय, डॉ बाबासाहेब आंबेडकर की जय , अहिल्याबाई होळकरांचा विजय असो, अण्णाभाऊ साठेचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणला होता . या मोर्चामध्ये सकल बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते . काही काळ नगरपालिका कार्यालय ते उदगीर रोडवरील वाहतूक बंद झाली होती. कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणुन पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.