माळेगाव | दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा माळेगाव यात्रेच्या पशुप्रदर्शनाची पूर्वतयारीची बैठक डॉक्टर प्रवीण कुमार घुले जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
सदर बैठकीत उद्या होणाऱ्या पशुप्रदर्शनासाठी लागणारे साहित्य व पशुप्रदर्शन समितीच्या डॉक्टरांची वेगवेगळ्या समितीमध्ये निवड करण्यात आली व सर्व डॉक्टरांना वेगवेगळ्या समित्या वाटून देण्यात आल्या. सदर बैठकीत नांदेड जिल्ह्यातील सर्व पशुधन विकास अधिकारी पशुधन पर्यवेक्षक सहाय्यक पशुधन विकास अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या चहा नाश्ता व जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. असे भोजन समितीचे प्रमुख डॉक्टर अविनाश बुन्नावार यांनी सांगितले.