Wednesday, May 13

Holi ; होळीनिमित्त सतत २५ व्या वर्षी होणा-या महामुर्ख कविसंमेलनाची नांदेड येथे जय्यत तयारी

नांदेड l होळीनिमित्त सतत २५ व्या वर्षी होणा-या महामुर्ख कविसंमेलनाची जय्यत तयारी झाली असून गुरुवार दि.१३ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६ ते १० वाजेपर्यंत मार्केट कमिटी मैदान,नवा मोंढा नांदेड येथे होणाऱ्या या अनोख्या कविसंमेलनात शृंगारिक कविता व द्विअर्थी विनोदाने देशातील नामवंत कवी नांदेडकरांना हास्यरंगात भिजवून टाकणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर, डॉ. जुगल धूत,जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांनी दिली.

संपुर्ण देशभरात फक्त बनारस आणि नांदेड या दोन ठिकाणीच अश्या प्रकारचे कविसंमेलन आयोजित करण्यात येते. होलीका उत्सव समिती नांदेड,लायन्स क्लब नांदेड सेंट्रल द्वारा आयोजित महामूर्ख कविसंमेलनाचे उद्घाटन आ.आनंदराव बोन्ढारकर यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिपकसिंह रावत तर विशेष अतिथी सतीश सुगनचंद शर्मा म्हणून उपस्थित राहणार आहेत.

प्रमुख अतिथी म्हणून ॲड.किशोर देशमुख ,व्यंकटेश जिंदम,डॉ. उमेश भालेराव,डॉ. सुशील राठी, शिवप्रसाद राठी, नागेश शेट्टी, आनंद साताळे, सचिन शिवलाड, सेवकसिंघ जहागीरदार, शिवाजीराव इबितवार, नवल पोकर्णा,संदीप अग्रवाल, राजेंद्र हुरणे, संजय बोधने, सुमेर राजपुरोहित हे राहणार आहेत.

आगळ्यावेगळ्या या कवी संमेलनात अनिल आवारा बनारस,विनोद सोनी मुंबई,लक्ष्मीचंद ठाकूर बालाघाट यांना विशेष आमंत्रित करण्यात असून त्यांच्या अजब शैलीमुळे श्रोते लोटपोट होणार आहेत.याशिवाय गेल्या अनेक वर्षापासून नांदेडचे महामूर्ख कवी संमेलन गाजविणारे हास्यसम्राट सिध्दार्थ खिल्लारे व शाहीर रमेश गिरी,चला हवा येऊ दे फेम सतीश कासेवाड,प्रा.रविंद्र अंबेकर पुणे, गझलकार बापू दासरी पत्रकार राजेंद्र शर्मा,रेश्माजी हिंगोले,सिनेस्टार लच्छु देशमुख,बजरंग पारीख,वैजनाथ जाधव,वसंतराव हिंगोले यवतमाळ हे होळीचा आनंद द्विगुणित करणार आहेत.संयोजन समितीमध्ये सुरेश लोट,कामाजी सरोदे,राजेशसिंह ठाकूर ,सुरेश शर्मा ,अरुण काबरा ,सुरेश निलावार, शिवाजीराव पाटील यांचा समावेश आहे.

दमराठवाड्यासह विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, तेलंगाना मधील रसिक या कविसंमेलनाला आवर्जून उपस्थित असतात. कार्यक्रम निशुल्क असला तरी १६ वर्षावरील पुरुषांनाच प्रवेश मिळणार आहे. जागा मर्यादित असल्यामुळे रसिकांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक ॲड.दिलीप ठाकूर,डॉ. जुगल धूत,पंढरीनाथ बोकारे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!