नांदेड| केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून अनु. जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन पध्दतीने महाडीबीटी प्रणालीद्वारे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येत आहे.
या योजनेमध्ये सैनिकी शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, 9 वी 10 वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, इ. 5 वी ते 7 वी आणि इ. 8 वी ते 10 वी मधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती,महर्षि विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क योजना इ. योजना राबविण्यात येत आहेत.
सदरील योजनांमध्ये लातूर विभागातील, लातूर जिल्ह्यातील एकूण शाळा २८२० त्यापैकी लॉगीन केलेल्या शाळांची संख्या २४७८ तर शिल्लक शाळांची ३४२, धाराशिव जिल्ह्यातील १८६४ पैकी २36 तर शिल्लक शाळांची संख्या 1628, नांदेड जिल्ह्यातील ३८२७ पैकी 3379 तर शिल्लक शाळांची संख्या 448 व हिंगोली जिल्ह्यातील १३९४ शाळांपैकी 945तर शिल्लक शाळांची संख्या 449 आहे. लातूर विभागात एकूण 9905 शाळा आहेत. त्यापैकी 7038 शाळांची मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीचे शाळेच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन लॉगीन झालेले आहे.
उर्वरित 2867 त शाळेंच्या मुख्याध्यापकांनी तात्काळ आपल्या शाळेचे लॉगीन करून ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत व पात्र विद्यार्थी योजनेपासून वंचीत राहणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा तसेच या योजनेसंदर्भात काही अडचन असल्यास संबंधित जिल्ह्याचे जिल्हा समाज कल्याण, अधिकारी यांचे कार्यायाशी संपर्क साधावा असे अवाहन लातूर विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी केले आहे.