नवीन नांदेड l नावा मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या मुख्य रस्त्यालगत असलेल्या विविध विभागांतील नाले सफाईला सिडको परिसरात सुरूवात करण्यात आली असून या उपक्रमाचे अनेकांनी स्वागत केले आहे.


नावा मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत संततधार पावसामुळे सखल भागातील व रस्त्यालगत असलेल्या अनेक वसाहती मध्ये व नाल्यांमध्ये कचरा व गाळ मोठ्या प्रमाणात साचल्याने दुर्गंधी यासह अनेक समस्यांना नागरीकांसह वाहनाधारकांना तोंड द्यावे लागत होते.तर परिसरातील होत असलेल्या घाण साम्राज्य मुळे महिला नागरीक युवक यांच्या सह परिसरातील नागरिकांनी संबंधीत दुर्गंधी मार्ग बदलुन ईतर भागातुन निवासस्थानी जात होते.


अखेर मनपा आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त गुलाम सादेक यांच्या सुचनेनुसार मुख्य स्वच्छता निरीक्षक वसीम तडवी यांनी स्वच्छता निरीक्षक किशन वाघमारे, रूपेश सरोदे यांनी सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत मुख्य रस्त्त्या लगत असलेल्या नाले सफाई सह सखल भागातील साचलेले कचरा ढिगारे साफ सफाई मोहीम दिवाळी पुर्वी सुरू केली असून या मोहिमे अंतर्गत इंदिरा गांधी हायस्कूल, दुर्गा माता परिसरासह , शाहुनगर भागातील नाली सफाई पुरूष कामगार यांच्या सह स्वच्छता विभागाचे कर्मचारी हे करीत आहेत.




