देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर येथून कारमधून अवैध गुटखा वाहतूक कणाऱ्या दोघांना देगलूर येथील पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून नऊ लाख वीस हजार चारशे रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ऑपरेशन फलश आउट अंतर्गत अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्या बाबत पोलीस निरीक्षक देगलूर याना आदेशीत केले होते. त्यावरून गुहा शोध पथकातील अंमलदार याना देगलूर परिसरात अवैध धंदे व चोरी करणार्या आरोपीचा शोध घेण्याकरिता तत्काळ रवाना करण्यात आले होते. गुन्हे शोध पथकातील पोलीस अमलदारानी देगलूर हद्दीतील अवैध धंद्यांची माहिती काढत असताना एक स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम एच 12 के एन ६०3९ या गाडीची तपासणी केली.



आरोपी शेख अख्तर शेख गफार बागवान शेख साजीद शेख जलाल बागवान वय ३८ रा सदर बाजार जामा मसजीद जवळ हिगोली यांच्या ताब्यातील कारमध्ये मानवी आरोग्यास धोका अपायकारक असलेल्या व राज्य शासनाने प्रतिबंधित घातलेल्या अन्नपदार्थ सुगंधी विमल पान मसाला, रजनीगधा पान मसाला, असा एकुण तीन लाख वीस हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल आढळून आला. त्यावरून सदरचा माल वाहतूक करणारी एक स्विफ्ट डिझायर कार सहा लाख रुपये असा एकूण नऊ लाख वीस हजार चारशे रुपयांचा माल जप्त करून कायदेशीर कारवाई केली आहे. सदर पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केलेल्या उक्रष्ट्र कामगिरी बद्दल पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी कौतुक करून अभिनंदन केले.




