नांदेड l मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांची जयंती दि.६ एप्रिल रोजी सर्वत्र साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने पतंजली योग समितीच्यावतीने ३, ५, ७ दिवसीय योग शिबिरे घेतली जाणार असून या दरम्यान विविध कार्यक्रमही घेण्यात येणार आहेत.


चैत्र महिन्याच्या शुक्लपक्ष नवमी तिथी ला प्रभु श्रीरामजीचा जन्मोत्सव साजरी केल्या जातो. यावर्षी दि. ६ एप्रिल रोजी प्रभु श्रीराम जन्मोत्सव म्हणजे अंधारातून – प्रकाशाकडे, असत्याकडून – सत्याकडे, वाईटातून – चांगल्याकडे वाटचाल करण्यासाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. मर्यादा पुरुषोत्तम अशी श्रीरामांची ओळख असल्याने त्यांच्या ठायी असलेली करुणा, दया, सत्य, सदाचार, सहनशीलता, धैर्य आदि गुण आपल्या अंगी बाणविण्याच्या उद्देशाने पतंजली योग समितीच्यावतीने जिल्हाभरात ३, ५, ७ दिवसीय योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.


मुख्य कार्यक्रम चंदगीराम अॅन्ड सन्स, रजिस्ट्री ऑफिस शेजारी, स्टेडियम रोड, नांदेड येथे सकाळी ५.३० ते ७.०० घेण्यात येणार आहे. विशेषत: मुलांसाठी लाठी-काठी चालविण्याचे प्रशिक्षण या निमित्ताने दिले जाणार आहे. या शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन पतंजली योग परिवार यांनी केले आहे.
