नांदेड। पतंजलि योग परिवार नांदेड तर्फे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या उपस्थित रविवार दिनांक 30 मार्च रोजी सकाळी 7.30 वा. गुढीपाडवा सणाचे औचित्य साधून हनुमान मंदिर परिसरात 108 कुंडी यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.


तसेच बळीराजा फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड चे डायरेक्टर मा. श्री नितिनजी चौहान यांचा पुढाकाराने व पतंजलि योग परिवार नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्हाभर तीन दिवसीय 51 निशुल्क योग शिबिराचे आयोजन केले आहे.


भारतीय संस्कृतित गुडिपाडव्याचे अनन्य महत्व आहे. भारतात हा दिवस नववर्ष दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. चेत्र महीन्याच्या शुक्लपक्ष प्रतिपदेला गुड़ी पाडवा साजरी करतात. या दिवसाला उगादि दिवस असे पन म्हनतात. प्रभु श्री रामाने रावणाचा वध करून लंकेवती विजय प्राप्त केले. बालीचा वध करून सुग्रीव व त्याच्या प्रजेचे बालीपासुन मुक्त केले.

याच दिवशी ब्रह्माजीने सृष्टिचा आरंभ केला म्हनुन हा दिवस नववर्ष दिवस साजरी केला जातो. पतंजलि तर्फे अशोक नगर ठिकाणी नवीन कैरी, नवीन चिंच, नवीन गुड, कडू लिंबाचा फुलेरा, खारिक, खोबर, चारोळी असा गोड, कडु, अंबट पदार्थ मिश्र करुन पनह तैयार करून सर्वाना दिला जातो. पतंजलि योग परिवार नांदेड, सर्व योग साधकाना या कार्यक्रमात उपस्थित राहन्याची विनती करते.
