नांदेड| आयुर्वेद शिरोमणी कलियुगाचे धन्वंतरी श्रद्धेय आचार्य श्री बाळकृष्ण जी महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त नांदेड ठिकाणी भव्य जडीबुटी रोप व विविध भिंतीपत्रकाद्वारे प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.


पोर्णिमा नगर नांदेड ठिकाणी अनिल अमृतवार ( ९८२३१३९९६९ ) यांच्या निवासस्थानी रविवार दिनांक ३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९.०० ते रात्री ८.०० पर्यंत हे जडीबुटी प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.


मा. श्री अनिलजी शेटकार प्रसिद्ध उद्योजक नांदेड, मा. श्री संतोषजी मुगाटकर वृक्ष मित्र परिवार नांदेड, मा. श्री डॉ. रमेशजी नारलावार हृदयरोग तज्ञ नांदेड, मा. श्री पंढरीनाथजी कंठेवाड कार्यकारणी सदस्य भारत स्वाभिमान महाराष्ट्र पूर्व, मा. श्री रामजी शिवपनोर जिल्हा अध्यक्ष भारत स्वाभिमान, मा. श्री महारुद्रजी माळगे कोषाध्यक्ष भारत स्वाभिमान, मा. श्रीमती नंदिनीताई चौधरी जिल्हा अध्यक्ष महिला पतंजली योग समिती यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रजल्वनाद्वारे जडीबुटी प्रदर्शनाची सुरुवात होणार आहे.


या जडीबुटी प्रदर्शनात वड, पिंपळ, जांभूळ, उंबर, बेल, आंबा, सिताफळ, रामफळ, गुळवेल, पानफुटी, अश्वगंधा, कांडवेल, समुद्रवेल, नागेली पान, केळी, नारळ, जांब, बोर, अश्वगंधा, सदाबहार, चमकुरा, गवत, एरंडी, रुचकी, जास्वंद, कनेर, फणस, अंगूर, गुलाब, चाफा, कडुलिंब, सागवान, लिची, तुळस, मनीप्लांट, कापूस, लिंबू, ईडलिंबू, करंज, अर्जुन, मोह, संत्री, मोसंबी, लाजाळू, रेनट्री, जखमजुडी, गुलमोहर, धोत्रा, मोगरा, रातराणी, ऊस, हळद, व इतर अनेक वनस्पती रोप व झाडांचे प्रदर्शन भरवले आहे. तसेच आचार्य बाळकृष्ण जी यांच्या आहार, दिनचर्या, जडीबुटी वनस्पती व त्यांचे लाभाची माहिती असलेले चारशे च्या वर भिंतीपत्रक या प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात येणार आहे.

या प्रदर्शनास पतंजली योग समितीचे पदाधिकारी, योगशिक्षक, योगसाधक भेट देणार आहेत. नांदेड पतंजली सर्व नांदेडकरांना तसेच निसर्गप्रेमी यांना या प्रदर्शनीस भेट देण्याचे आवाहन करत आहे.


