नांदेड| रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी संघटनेला सोडचिठ्ठी देत शरद पवार यांच्या उपस्थितीत जळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव काळे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
माजी कृषी राज्यमंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी सातत्याने लोकनेते शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे व मराठा आरक्षण आंदोलनाची चेष्टा करणे आणि शेतकऱ्याच्या प्रश्नापासून कोसोदूर जाऊन एक व्यक्तीकेंद्री भूमिका घेत, धर्मांध पक्षाच्या बाजूने घेतलेली भूमिका घेत असल्यामुळे ह्या गोष्टी आपल्या मनाला न रुजल्यामुळे पांडुरंग शिंदे यांनी संघटनेला आणि सदाभाऊ खोत यांना सोडचिट्टी देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केला आहे
पांडुरंग शिंदे गेल्या 15 वर्षापासून शेतकरी चळवळतीमध्ये कार्यरत होते.विद्यार्थी दशेपासून मा.राजू शेट्टी व आ.सदाभाऊ खोत यांचे बोट धरून चळवळीत कार्य सुरू केले. स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष असताना स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा वाढीसाठी पुणे येथे विद्यार्थ्यांचे आंदोलन करून आपल्या नेतृत्वाची चूनक त्यांनी दाखवली होती.
राज्यातील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादित वाढीचा ऐतिहासिक निर्णय सरकारकडून करून घेण्यात पांडुरंग शिंदे यांचा सिंहाचा वाटा आहे. सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हाकालपट्टी केल्यानंतर त्यांच्यासोबत खंबीरपणे उभा राहणारा राज्यातील प्रमुख कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. रयत क्रांती संघटना स्थापनेचा संस्थापक सदस्य, राज्य प्रवक्ता ,सध्या युवा प्रदेशाध्यक्ष या पदावर पांडुरंग शिंदे कार्यरत आहेत.
शेतकऱ्याच्या प्रश्नावर आक्रमक व अभ्यासपूर्वक मांडणी करणारे तसेच अनोखे आंदोलन करण्यासाठी ओळख असणारे पांडुरंग शिंदे हे सोयाबीन -कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सातत्याने आंदोलन करत असतात. दूधदर भाव वाढ आंदोलन, ऊसदर आंदोलन, पीक विमा साठी आंदोलनात सातत्याने भाग घेऊन सरकार दरबारी आपला हक्क मागितला आहे.
पांडुरंग शिंदे यांनी संघटनेला सोडचिट्टी दिल्यामुळे मराठवाड्यामध्ये सदाभाऊ खोत यांना मोठा धक्का लागण्याची शक्यता आहे ,कारण मराठवाड्याच्या कार्यकर्त्यावर शिंदे यांची पकड आहे. महायुतीमध्ये रयत क्रांती संघटना असून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फरपकड होत आहे संघटनेच्या कार्यकर्त्याला नगण्य स्थान असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.