नवीन नांदेड| नवरात्र महोत्सव निमित्ताने पंचक्रोशीतील नावलौकिक असलेल्या श्री. सत्याआई देवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून दैनंदिन सकाळी नवरात्र महोत्सव समिती तर सायंकाळी गावातील परिवार यांच्या वतीने महाआरती करण्यात येत असून 12 ऑक्टोबर रोजी गावातून देव पालखी आयोजित करण्यात आली आहे.
श्री सत्यआई देवी नवरात्र महोत्सव काकांडी येथील जागृत देवी श्री सत्यआई देवी पुढे पूर्वी शेकडो बकऱ्यांचा बळी जायचा, पशुहत्येची प्रथा श्री संत तनपुरे महाराज पंढरपुरकर यांनी बंद करून देवीला पुरण पोळीचा नैवद्य सुरु केला व गावकऱ्यांना तुळशीमाळा घालून पशुहत्येपासून मुक्त केले,पुढे ही देवी नवसाला पावणारी म्हणून प्रसिध्दीस आली.


आजही प्राचीन काळापसून श्री सत्यआई देवीची यात्रा दर तीन वर्षांनी भरते. परिसरातील सुहासिनी बाई-लेकी देवीला पुर्वी बकऱ्याचा बळी देणाऱ्या आता पुरण पोळीचा नैवद्य चढवून खणनारळांनी ओटी भरुन मनोकामना पूर्ण करतात. केलेला नवस पूर्ण करण्यासाठी आजही देवीला सोने चांदीचे पाळणे वाहतात,अशी ही नवसाला पावणारी श्री सत्यआई देवीची महोत्सवा निमित्ताने विविध सामाजिक व सांस्कृतिक प्रभोधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.


दि.03 ते 12 ऑक्टोबर 24 पर्यंत नवरात्र महोत्सवात विविध सांस्कृतीक धार्मिक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. दि.03 ते 12 ऑक्टोबर दरम्यान रोजी विधीवत सकाळची आरती नवरात्र महोत्सव समिती कडून तर संध्याकाळी महाआरती व महा प्रसादाचे यजमान वर्ताळे,भागानगरे, सोळंके, मुंगल,परिवार कानोले,कुंभार, भंडारे परिवार, देशमुख, येडे, सोरगे,वल्लेप,वाघमारे,देवकर, चमकुरे,मंजेलवर, चव्हाण परिवार पवार, साखरे, वैद्य, पातळे, काळे, तळपटे परिवार कोंके, जिंके, पेरले, मंडले, करेवाड, सगर, चंदेवाड,मंदावाड,मल्लेवार, हांडे, निमेवाड,तोटेवाड,गायकवाड, तेलंगे,बारोळे परिवार भवर, पवितवार,गिरी,स्वामी परिवार बंडे, झंपलवाड,शेळके,मंदवाड बिंगेवाड, जानापुरे सोनार,आदेवाड, कोडेवाड,राजमोरे,बतलवाड, लिंबेवाड परिवार ,बागल जाधव,गंगातिरे, काकडे,कदम,पांचाळ,पोपळाईतकर, पावडे, हेंडगे,चव्हाण, शिंदे, काकांडीकर परिवार असुन १२ऑक्टोबर रोजी देव पालखी आयोजित करण्यात आली असून पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या सोहळ्यात सहभागी होऊन दर्शन लाभ घेण्याचे आवाहन समस्त गावकरी मंडळी यांनी केले आहे.
