Navratri Festival ; काकांडी येथील श्री सत्याआई देवी नवरात्र महोत्सव निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजन – NNL
नवीन नांदेड| नवरात्र महोत्सव निमित्ताने पंचक्रोशीतील नावलौकिक असलेल्या श्री. सत्याआई देवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून दैनंदिन सकाळी नवरात्र महोत्सव समिती तर सायंकाळी गावातील परिवार यांच्या वतीने महाआरती करण्यात येत असून 12 ऑक्टोबर रोजी गावातून देव पालखी आयोजित करण्यात आली आहे.
श्री सत्यआई देवी नवरात्र महोत्सव काकांडी येथील जागृत देवी श्री सत्यआई देवी पुढे पूर्वी शेकडो बकऱ्यांचा बळी जायचा, पशुहत्येची प्रथा श्री संत तनपुरे महाराज पंढरपुरकर यांनी बंद करून देवीला पुरण पोळीचा नैवद्य सुरु केला व गावकऱ्यांना तुळशीमाळा घालून पशुहत्येपासून मुक्त केले,पुढे ही देवी नवसाला पावणारी म्हणून प्रसिध्दीस आली.
आजही प्राचीन काळापसून श्री सत्यआई देवीची यात्रा दर तीन वर्षांनी भरते. परिसरातील सुहासिनी बाई-लेकी देवीला पुर्वी बकऱ्याचा बळी देणाऱ्या आता पुरण पोळीचा नैवद्य चढवून खणनारळ...
