One killed in bus accident coming from Unkheshwar to Kinwat किनवट, परमेश्वर पेशवे| उनकेश्वर हुन किनवट कडे येणाऱ्या एम. एच. 14 बी. टी .2105 या क्रमांकाच्या परिवहन महामंडळ बसचा व ए .पी .02 बि .डी .66 69 या क्रमांकाच्या बोलेरो महिंद्रा जीप चा समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला या अपघातात जीप चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा भीषण अपघात किनवट तालुक्यातील अंबाडी घाटामध्ये 1 जुलै रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडला.


या भीषण अपघातात चार ते पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की बोलेरो जीपचा समोरचा भाग पूर्ण चकणाचुर झाल्याने बोलेरो जीपचा ड्रायव्हर हा बोलेरो जीप च्या स्टेरिंग मध्येच अडकल्याने नागरिकांनी त्या ड्रायव्हरला बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले व पुढील उपचारासाठी आदिलाबाद कडे नेत असताना त्या चालकाचा वाटेतच मृत्यू झाला.


या भीषण अपघातात मृत्यू पावलेल्या बोलेरो जीप चालकाचे नाव पप्पू व्यंकटेश असल्याचे समजते.
या अपघाताची माहिती पोलिसांना व परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना मिळताच
किनवट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे व पोलीस कर्मचारी आणि परिवहन महामंडळाचे किनवट येथील आगार प्रमुख यशवंतराव खिल्लारे, तसेच विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश भारती व विभागीय यंत्र अभियंता कोरटकर हे घटनास्थळी दाखल झाले होते. चालक सेनेचे तालुका अध्यक्ष गजानन चंद्रे यांनी याप्रसंगी बोलेरो चालकास जीप मधून काढून वाचवण्याचा अतोनात प्रयत्न केला पण त्याच्या प्रयत्नाला यश आले नाही.



