नांदेडलाइफस्टाइल

Kandahar Accident News : कंधार तालुक्यात कार मोटार सायकलच्या अपघातात एक ठार दोन गंभीर

मुलगी पाहायला जाणाऱ्या तीन दुचाकी स्वारांना भरधाव कारने दिली धडक

कंधार (सचिन मोरे) मुलगी पाहायला जाणाऱ्या तीन दुचाकी स्वारांना भरधाव वेगाने जाणाऱ्या कार ने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हि दुर्घटना १७ मार्च रोजी दुपारी दोनच्या सुमारास बहादरपुरा ते फुलवळ रोडवरील एमआयडीसीच्या उतारास घडली. या घटनेमुळे कंधार तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, एमएच ३१ सीएस ०७५७ या क्रमांकाची चार चाकी महिंद्रा झायलो कार ही बिदर येथील गुरुद्वाराचे दर्शन करून फुलवळ मार्गे नांदेड कडे जात होती. तर एमएच २६ सीक्यू २९८२ व एमएच २६ सीआर ७६८६ या क्रमांकाच्या दोन दुचाकी गाड्यावरून राजू लक्ष्मण डुबुकवाड वय ४० वर्ष राहणार पानभोसी, विजय संभाजी अमृतवाड वय २५ वर्ष राहणार बावलगाव ता. मुखेड हे एका मोटारसायकलवर तर दुसऱ्या मोटारसायकलवर शुभम नारायण तिगोटे वय २६ वर्ष राहणार रिसनगाव ता. लोहा असे तिघे मिळून मुखेडकडे जात असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या झायलो कारने सदरच्या दोन्ही दुचाकीस जोराची धडक दिली.

दुचाकीवरील राजू लक्ष्मण डुबुकवाड राहणार पानभोसी तालुका कंधार हे गंभीर जखमी झाले त्यांना कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केली असता उपचारादरम्यान ते मयत झाले. तर विजय अमृतवाड व शुभम तिगोटे यांना जबरदस्त मार लागल्यामुळे या दोघांचीही तब्येत गंभीर असल्याकारणामुळे त्यांना पुढील उपचारासाठी गुरुगोविंद सिंह रुग्णालय नांदेड येथे पाठविण्यात आल्याची माहिती कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीनिवास जाधव यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना दिली.

दरम्यान सदरील घटना झाल्याचे कळताच कंधार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब सानप, पोलीस उपनिरीक्षक स्नेहा पिंपरखेडे, पोहेकॉ बालाजी गारोळे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तात्काळ प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय कंधार येथे दाखल केले. सदर घटनेचे वृत्त लिहीपर्यंत कंधार पोलीस ठाण्यात याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. व मयताचे शवविच्छेदन झाले नव्हते.गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी दिली.

पानभोसी गावावर शोककळा
कार व दुचाकीच्या अपघातात राजू डुबुकवाड हा युवक ठार झाल्याची वृत्त कळतात पानभोसी गावावर एकच शोककळा पसरली. मयत राजू हा दोन्ही पायाने अपंग होता त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी राजू ने किराणा दुकान थाटले होते. राजू डुबुकवाडच्या पश्चात पत्नी व दोन मुले असल्यामुळे पानभोसीतील गावकऱ्यांमधन हळहळ व्यक्त होत असून त्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने ऐकावयास मिळाली.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button