नवीन नांदेड| अवतार सिंघ सोडी मित्र मंडळ सिडको यांच्या वतीने शिक्षकदिना निमित्ताने परिसरातील विविध शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या लेखणी व पुष्पगुच्छ देऊन संस्थापक अध्यक्ष अवतार सोडी यांनी केला.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अवतार सिंघ मित्र मंडळ यांच्या वतीने ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त सिडको परिसरातील कुसुमताई हायस्कूल, शिवाजी हायस्कूल, इंदिरा गांधी, विधानिकेतन प्राथमिक व माध्यमिक शाळा, राष्ट्रमाता कस्तुरबा गांधी शाळा, महात्मा गांधी विघालय सिडको, अल्लामा इकबाल ऊर्द शाळा सिडको, संतोष प्राथमिक शाळा, अल्लमा इकबाल ईस्लावुल ऊर्द शाळा,येथील शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षेकतेर कर्मचारी यांच्या लेखणी व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी संतोष प्राथमिक शाळा हडको येथील शिक्षक दिनानिमित्त आयोजित शिक्षक दिनानिमित शिक्षक व शिक्षिका साकारलेल्या आकाश डोमपंले,रितेश खंगळे,आर्दश धमणे,वैभव काळे, गणेश मुळे,अभिनव सोनकांबळे,अविनाश मोरे,अजंली रामगिरवार, धनश्री पांचाळ,प्रकृती क्षिरसागर,रेणु स्वामी,अवनी लोंढे,यश कांबळे,गौरी कळसकर, यांच्या सह अनेक विधार्थी व विधार्थीनीचा सत्कार करण्यात आला आहे, यावेळी नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश ठाकूर, किरण देशमुख,अनिल धमणे, दिगंबर शिंदे,सारंग नेरलकर,राजु टमान्ना, सचिन बारटक्के,यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.