किनवट| तालुक्यातील धामणदरी येथील सततच्या पावसामुळे हेक्टरवरील पिकांचे नुकसान अनेक शेतकऱ्याचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.


सततच्या पावसामुळे कापसाच्या व सोयाबीन , तूर वरच्या पिकाचे नुकसान होणे ही एक गंभीर समस्या आहे, जी अनेक शेतकऱ्याचे नुकसानामुळे अडचणीत आले आहे. सततचा पाऊस कापसाच्या शेवटच्या टप्प्यातील उत्पादनावर मोठा परिणाम करतो. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते आणि त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरते.



शासनाकडे कळकळीची विनंती आहे शेतकऱ्यांची शासनाने अशा वेळी त्यांचा संबंधित विभागाला कळवून तलाठी साहेब ,मंडळ अधिकारी साहेबांनी जयमोक्यावर वर जाऊन तत्काळ पंचनामा करून नुकसानभरपाई देणे आवश्यक आहे. मी एक शेतकरी म्हणून शासनाकडे अशी अपेक्षा करतो . शेतकऱ्याचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पिके वाहून गेली आहेत.




