Wednesday, May 13

Kaleshwar Vishnupuri ; माघ पौर्णिमा निमित्ताने तिर्थक्षेत्र काळेश्वर विष्णुपुरी येथे भाविक भक्तांची स्नानसह दर्शनासाठी मंदिरात गर्दी

नवीन नांदेड l माघ पौर्णिमा निमित्ताने 12 फेब्रुवारी रोजी तिर्थक्षेत्र काळेश्वर येथे गोदावरी नदीच्या काठी अनेक भाविक भक्तांनी स्नान करून महादेव दर्शन केले यावेळी काळेश्वर ट्रस्ट चा पदाधिकारी यांनी व ग्रामपंचायत विष्णुपुरी यांच्या वतीने पार्किंग व दर्शनासाठी व्यवस्था केली.

पंचक्रोशीतील प्रसिद्ध असलेल्या तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर विष्णुपुरी येथे माघ पौर्णिमा निमित्ताने 12 फेब्रुवारी पहाटे तिनं वाजता सतिश महाराज, शिवलिंग धनमणे, रामेश्वर धनमणे यांनी विधीवत पूजन केले.

भाविक भक्तांनी गोदावरी नदीच्या काठी स्नान करून दर्शन साठी सकाळ पासून दुपार पर्यंत महिला नागरीक ग्रामस्थ यांच्या सह अनेक गावांतून, शहरी भागातुन चारचाकी तिनं चाकी, दुचाकी वरून अनेकांनी स्नान करून दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पुजेच्या साहित्य असलेले अनेक दुकाने लावण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!