नांदेड| येथील डॉक्टर लाईन परिसरातील उमरेकर हॉस्पिटलचे संचालक तथा समाजसेवक डॉ.सचिन संभाजी पाटील उमरेकर यांचा पुढील महीन्यातील ११ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे त्या निमित्ताने रुग्णसेवा आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून मौजे काकांडी ता. नांदेड येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी औषधी व मोफत मोतबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे
त्या उपक्रमाची सुरूवात म्हणून दि.९ ऑगस्ट रोजी मौजे काकांडी ता.नांदेड येथे डॉ.सचिन संभाजी पाटील मित्र मंडळ नांदेड दक्षिण मतदार संघ यांच्या वतीने आयोजन केले होते या शिबिराचा २१४ रुग्णांनी लाभ घेतला व या शिबिरासाठी तज्ञ डॉक्टर म्हणून कान – नाक- घसा तज्ञ डॉ सचिन शिंदे , जनरल सर्जरी चे सर्जन डॉ सचिन ढवळे , दंतरोग तज्ञ डॉ माधव ढगे, नेत्ररोग तज्ञ डॉ ज्ञानेश्वर वैद्य, जनरल फिजिशियन डॉ राम गनगोपले यांच्यासह विविध तज्ञ डॉक्टर्संनी सर्व रुग्णांची तपासणी करत उपचार केले व पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन केले.
हे आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी ह.भ.प यज्ञकांत महाराज, काकांडीचे सरपंच शरद भवर,राजू बागल, संभाजी घोगरे,बळवंत भागानगरे,बाळू महाराज गिरी, तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश पाटील बागल, रावण वरताळे,दीपक पवार ,श्रीराम पाटील ,दशरथ पाटील ,शिवाजी शेळके, वेंकोबा कानोले, हरी पवार ,बाबू भवर ,बळीराम पाटील, हनुमंत पाटील ,आनंदा देशमुख समस्त काकांडी येथील गावकरी मंडळीचे सहकार्य लाभले.