HomeनांदेडRelief continues : पूरग्रस्त राहेगावात मदतीचा ओघ सुरूच : महसूल प्रशासनाच्या सहकार्याने...

Relief continues : पूरग्रस्त राहेगावात मदतीचा ओघ सुरूच : महसूल प्रशासनाच्या सहकार्याने धान्य किटचे वाटप

नांदेड| नांदेड तालुक्यातील पूरग्रस्त राहेगावातील नागरिकांसाठी मदतीचा ओघ सुरूच आहे. विविध सामाजिक संघटना आणि शासकीय यंत्रणा एकत्र येऊन मदतकार्य हाती घेत आहेत. महसूल प्रशासनाच्या सहकार्याने दिनांक 5 ऑक्टोबर रोजी ग्रामस्थांना धान्य किटचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना, विष्णुपुरी यांनीही या मदत कार्यात सक्रिय सहभाग नोंदवून धान्य किट उपलब्ध करून दिले.

गोदावरी नदीच्या बॅकवॉटरमुळे राहेगावला जाणाऱ्या पुलावर पाणी आल्याने गावाचा संपर्क जवळपास दहा दिवस होता. या परिस्थितीत नांदेडचे तहसीलदार संजय वारकड यांनी वेळोवेळी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून मदतकार्य सुनिश्चित केले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक संघटनांच्या सहकार्याने धान्य किटचे वितरण करण्यात आले.

यापूर्वी 30 सप्टेंबर रोजीही राहेगावात धान्य किट वाटप करण्यात आले होते. तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण मुंडे यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथकाने १८ सप्टेंबर रोजी १०५, २८ सप्टेंबर रोजी १०२ आणि ३० सप्टेंबर रोजी ५६ रुग्णांची तपासणी करून आवश्यक औषधोपचार केले. महावितरणच्या सहकार्याने गावातील विद्युतपुरवठा पुनर्संचयित करण्यात आला.

flood 1 Relief continues : पूरग्रस्त राहेगावात मदतीचा ओघ सुरूच : महसूल प्रशासनाच्या सहकार्याने धान्य किटचे वाटप

धान्य वाटप कार्यक्रमात वाजेगाव व तुप्पा महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी प्रमोद बडवणे, ग्राम महसूल अधिकारी गौतम पांढरे, राहेगावचे सरपंच विलास पाटील इंगळे, पोलीस पाटील प्रतिनिधी संजय पाटील इंगळे आणि मारोतराव पाटील इंगळे यांसह महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. राहेगावातील नागरिकांनी या कठीण काळात प्रशासन आणि सामाजिक संस्थांकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments