देगलुर, गंगाधर मठवाले। देगलूर येथील वीर जवान सचिन यादव वनंजे यांचे 6 मे रोजी जम्मू कश्मीर येथे सिमेवर कर्त्यव्य बजावत असतांना त्यांना वीरमरन प्राप्त झाले. म्हणून त्यांच्या कुटुंबाला यश सिद्धी आजी-माजी सैनिक बहुउद्देशीय वेलफेअर असोशियन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देगलूर येथील शहीद सचिन यादव वनंजे यांच्या कुटुंबाला एक लाख रुपये आर्थिक मदत केली.


महाराष्ट्रातील सर्व महार रेजिमेंट मधील आजी-माजी सैनिकांच्या वतीने देण्यात आली यावेळी वीर जवान शहीद सचिन यादव वनंजे यांना भावपूर्ण श्रद्धांजली सैनिकी पद्धतीत रिथलिंग परेड द्वारे मानवंदना देण्यात आली. यावेळी १०७१ चे युद्धवीर सुभेदार मेजर ऑ.कॅप्टन बाबू पोलके सुभेदार रघुनाथ भालेराव तसेच सुभेदार प्रदीप गायकवाड अध्यक्ष अमरावती , कैलास खिल्लारे सचिव बुलढाणा, कान्हु गायकवाड वाशीम बुद्धा चव्हाण विभागीय अध्यक्ष पुणे, सुरेंद्र गोंवदे, पुणे अध्यक्ष सुभेदार संतोष वानखेडे उपाध्यक्ष सुभेदार पोपट आल्हाट,सुभेदार पंडीत म्हस्के ,सत्येंद्र लोखंडे.

संभाजी नरवाडे,धनराज धबडे, आबाजी गजमत, साहेबराव चौदंते, शिवाजी वाघमारे, सिद्धोधन गच्चे, बापू पवार ,मधुकर सोनकांबळे ,यादव सोंनकांबळे, शनिदास नरवाडे ,सुरेश हणमंते, बुद्धाजी गवळी, मिथुन भावे, गंगाधर मोरे,पांडुरंग राऊत, गणपत गायकवाड़, मोहन कदम ,कमलाकर कांबळे, देवराव झगडे ,खंडू देवगावकर, रमेश कांबळे ,शेषेराव लोखंडे , संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आजी-माजी सैनिक यावेळी उपस्थित होते तसेच यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली तमलुरचे सरपंच संतोष मांडे,मारोती गायकवाड पो.पा.तमलुर, कैलास खिल्लारे, यश सिद्धी असोसिएशनचे सचिव यांनी महार रेजिमेंट बद्दल माहिती दिली .प्रा.डॉ. भीमराव माळगे यांच्यासह अनेकांनी भावपूर्ण श्रद्धांजली विचार व्यक्त केले.


यावेळी सुभेदार प्रदीप गायकवाड अध्यक्ष,यश सिद्धी आजी-माजी सैनिक बहुउद्देशीय वेल्फेअर असोसिएशन, यांनी वीर जवान सचिन वनंजे यांच्या कुटुंबाला संघटनेच्या वतीने शासनाला पाठपुरावा करून देण्यात मदत देण्यात येईल असे सुभेदार प्रदीप गायकवाड यांनी भावपूर्ण श्रद्धांजली पर आपले विचार व्यक्त करताना म्हणाले, यावेळी देगलूर येथील माजी सैनिक शेषराव लोखंडे, रमेश कांबळे व्यंकट बोरगावकर, भीमराव देगलूरकर केरबा वाघमारे , नवीद अंजुम, आयान लाला, प्रा.भीमराव दिपके,सतिष पांडवे पत्रकार, तसेच देगलूर येथील सर्व पदाधिकारी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .


