financial aid : यश सिद्धी बहुउद्देशीय वेलफेअर असोसिएशनच्या वतीने ; शहीद जवान सचिन वनंजे यांच्या कुटुंबाला एक लाख रुपयाची आर्थिक मदत
देगलुर, गंगाधर मठवाले। देगलूर येथील वीर जवान सचिन यादव वनंजे यांचे 6 मे रोजी जम्मू कश्मीर येथे सिमेवर कर्त्यव्य बजावत असतांना त्यांना वीरमरन प्राप्त झाले. म्हणून त्यांच्या कुटुंबाला यश सिद्धी आजी-माजी सैनिक बहुउद्देशीय वेलफेअर असोशियन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देगलूर येथील शहीद सचिन यादव वनंजे यांच्या कुटुंबाला एक लाख रुपये आर्थिक मदत केली.
महाराष्ट्रातील सर्व महार रेजिमेंट मधील आजी-माजी सैनिकांच्या वतीने देण्यात आली यावेळी वीर जवान शहीद सचिन यादव वनंजे यांना भावपूर्ण श्रद्धांजली सैनिकी पद्धतीत रिथलिंग परेड द्वारे मानवंदना देण्यात आली. यावेळी १०७१ चे युद्धवीर सुभेदार मेजर ऑ.कॅप्टन बाबू पोलके सुभेदार रघुनाथ भालेराव तसेच सुभेदार प्रदीप गायकवाड अध्यक्ष अमरावती , कैलास खिल्लारे सचिव बुलढाणा, कान्हु गायकवाड वाशीम बुद्धा चव्हाण विभागीय अध्यक्ष पुणे, सुरेंद्र गोंवदे, पुणे अध्यक्ष सुभेदार...
