नवीन नांदेड| केद्रीय गृहमंत्री कै.डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या जयंती निमीत्य “एक झाड आई- वडिलांच्या प्रेमासाठी ” या उपक्रमाअंतर्गत एक सावलीचं किंवा फळाचं झाड लावण्याचं मनोदय कुसुमताई माध्यमिक शाळा सिडको नवीन नांदेड या शाळेनं घेतला असून सिडको परिसरातून झाडे लावा झाडे जगवा वृक्ष दिंडी काढून संदेश देणार आहेत.


१४ जुलै केद्रींय गृहमंत्री कै. शंकरराव चव्हाण यांच्या जयंती निमित्ताने सिडको परिसरातील विविध उपक्रम व सामाजिक सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रम घेण्यामध्ये अग्रेसर असलेल्या कुसुमताई माध्यमिक विद्यालय येथील शेकडो विद्यार्थ्यानी स्वखर्चाने 500 झाडे आणली. उद्या 17 जुलै रोजी मंगळवारी वृक्षदींडी काढून *झाडे लावा, झाडे जगवा* हा संदेश देण्याचा छोटासा प्रयत्न शालेय प्रशासन करत आहे. ही झाडे मुलं आपल्या घराच्या अंगणात, मोकळ्या जागेत, गल्लीत, परीसरात आई- वडिलांच्या हस्ते करणार आहेत. आपण निसर्गाला कांही देणे लागतो हाच संस्कार मुलांच्या मनावर बिंबवण्यासाठी हे उपक्रप विध्यालय राबवत आहे.


या कामी संस्थेचे सचीव संभाजीराव बिरादार मुख्याध्यापीका सौ.शशिकलाताई जाधव- बिरादार ,पर्यवेक्षक शेख निजाम गवंडगावकर, सौ. उज्वला सावते यांचे मार्गदर्शन लाभलं तर सांस्कृतिक प्रमुख विश्वास हंबर्डे, सौ.वंदना सोनाळे , एस डी जाधव,नरसिंग यलमलवाड, सुर्यंकात वडजे, लक्ष्मण येसके, युवराज शिंदे यानी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आणि सर्वच शिक्षक बांधव -भगीनी परिश्रम घेत आहेत.




