नांदेडमहाराष्ट्र

Not a bridge but a deth trap ; पूल नव्हे, मृत्यूचा सापळा! गवंडगावातील पूल धोकादायक अवस्थेत; ग्रामस्थ संतप्त, आंदोलनाचा इशारा

देगलूर, गंगाधर मठवाले। देगलूर तालुक्यातील गवंडगावजवळील मुख्य रस्त्यावर असलेला पूल सध्या अक्षरशः धोकादायक अवस्थेत असून, पावसाळ्याच्या सुरुवातीलाच त्याची दयनीय अवस्था उघड झाली आहे. पुलाच्या दुतर्फा वाढलेली झाडाझुडपे, तळातून वाहणाऱ्या पाण्यामुळे झालेली झीज आणि रस्त्यावरचे खड्डे पाहता, मोठ्या अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

हा रस्ता बल्लूर फाटा ते मानूर दरम्यान सुमारे १० ते १५ गावांना जोडतो. या पुलावरून दररोज शेकडो वाहनचालक, शालेय विद्यार्थी, वृद्ध नागरिक व महिला यांची ये-जा सुरू असते. मात्र, पुलाची बाजूची संरचना पूर्णपणे कोसळली असून, रस्त्यावर जागोजागी मोठाले खड्डे तयार झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना प्रचंड धोका पत्करून प्रवास करावा लागत आहे.

प्रशासन झोपेत… दुर्घटना होईपर्यंत वाट पाहणार का?
ग्रामस्थांनी अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभाग व स्थानिक प्रशासनाकडे तक्रारींचा पाढा वाचूनही कोणतीही ठोस कारवाई अद्याप झालेली नाही. “दुर्घटना होईपर्यंतच प्रशासनाला जाग येणार का?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास आंदोलन!
या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देत पूल डागडून दुरुस्त करावा किंवा नवीन पूल उभारण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला गेला आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!