Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
  • रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित
  • Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात
  • Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Voter’s Day : राष्ट्रीय मतदार दिन आणि भारतीय नागरिकांचे कर्तव्य
नांदेड मुंबई लेख January 23, 2026

Voter’s Day : राष्ट्रीय मतदार दिन आणि भारतीय नागरिकांचे कर्तव्य

NNL TeamBy NNL TeamJanuary 23, 202617
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

25 जानेवारी हा दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. याच दिवशी, 25 जानेवारी 1950 रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. स्वतंत्र भारताने लोकशाहीची वाट स्वीकारल्यानंतर, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी या घटनात्मक संस्थेकडे सोपवण्यात आली. त्यामुळे भारतीय लोकशाहीत 25 जानेवारी या दिवसाला अतिशय महत्व आहे.  तथापि, नागरिकांना आपल्या मताची किंमत, उपयोगिता, महत्व आणि कर्तव्य कळावे यासाठी 25 जानेवारी 2011 पासून हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा होतो. 2026 हे वर्ष राष्ट्रीय मतदार दिनाचे 16 वे वर्ष आहे. निवडणूक आयोगाने यावर्षी राष्ट्रीय मतदार दिनाचे ब्रीद वाक्य ‘माझा भारत माझे मत ‘ हे ठेवले आहे.

भारत हा जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश म्हणून ओळखला जातो. येथे कोट्यावधी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतात. भारतीय लोकशाहीचा अभ्यास करण्यासाठी जगभरातून अभ्यासक, संशोधक आणि लोकशाहीप्रेमी भारतात येतात. यामागे भारतीय लोकशाहीची काही मूलभूत वैशिष्ट्ये आहेत.  यामध्ये सार्वत्रिक प्रौढ मतदानाचा अधिकार, एक व्यक्ती–एक मत–एक मूल्य ही संकल्पना, धर्म, जात, लिंग, भाषा, आर्थिक स्थिती यांपलीकडे जाऊन दिलेला समान मतदानाचा हक्क, या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानात अनुच्छेद 326 नुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा समान अधिकार बहाल करण्यात आला आहे. हा अधिकार केवळ मतदानापुरता मर्यादित नसून, तो देशाच्या भवितव्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे.

आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून संविधानाची अंमलबजावणी होते, कायदे बनतात, धोरणे ठरतात आणि देशाची दिशा निश्चित होते. त्यामुळे मतदानाचा हक्क म्हणजे सामान्य नागरिकांच्या हातात दिलेले अत्यंत प्रभावी लोकशाही अस्त्र आहे.  आपले एक-एक मत ग्रामपंचायतीपासून तर संसदेच्या माध्यमातून देश घडविण्यात महत्वपूर्ण ठरते.  या देशासाठी काय करायचे तर सर्वप्रथम जागरुक मतदार बनायचे व मतदानाचा हक्क प्रत्येक निवडणुकीत गाजवायचा हे प्रथम कर्तव्य संविधानाला अपेक्षित आहे.  18 वर्षावरील प्रत्येक सुजाण नागरिकाला हा हक्क संविधानाने दिला आहे.

राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याची सुरुवात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या कार्यकाळात झाली. यामागील मुख्य उद्देश म्हणजे प्रत्येक नागरिकाला मतदार म्हणून जागरूक करणे, मतदानाचे महत्त्व समजावून सांगणे आणि विशेषतः नवमतदारांना लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रेरित करणे. “माझ्या एका मताने काही फरक पाडत नाही” ही भावना लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. प्रत्यक्षात प्रत्येक मत महत्त्वाचे असते आणि अनेक वेळा एका मतानेही निकाल बदलू शकतो.

मतदानातून बहुसंख्य नागरिकांचा विचार प्रतिबिंबित होतो. देश कसा असावा, कायदे कसे असावेत, परस्पर सौहार्द, एकमेकांचा संस्कृतीचा आदर, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय, समानता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सांस्कृतिक विविधतेचा आदर कसा राखला जावा यासोबतच मूलभूत सुविधा, विकास, पायाभूत सुविधा, नागरी सुविधा हे सर्व काही निवडणुकांमधून ठरते. म्हणूनच मतदान म्हणजे केवळ अधिकार नाही, तर ते एक देश घडविणारे मूलभूत कर्तव्य आहे.

काही वेळा मतदान अनिवार्य का नसावे, असा प्रश्न उपस्थित केला जातो. मात्र जिथे सक्ती असते, तिथे लोकशाहीचा आत्मा कमी होतो. भारतात मतदान ऐच्छिक ठेवून नागरिकांच्या विवेकावर आणि कर्तव्यभावनेवर विश्वास ठेवण्यात आला आहे. म्हणूनच निवडणूक आयोग विविध जनजागृती मोहिमा, मतदार नोंदणी अभियान, स्विप (SVEEP) जनजागृती कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना स्वयंस्फूर्तीने मतदानासाठी प्रवृत्त करतो.  यामागे माझा देश कसा असावा, ही स्वयंप्रेरणा प्रत्येक मतदाराला असावी अशी लोकशाहीमध्ये अपेक्षा आहे.

त्यामुळे येत्या 25 जानेवारीला मतदार दिन साजरा करताना राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकाने स्वतःकडे आणि आपल्या कुटुंबाकडे बघण्याची गरज आहे.  आपण मतदार आहोत का, आपले नाव मतदार यादीत आहे का, आपले मतदान केंद्र कुठे आहे, याची माहिती वेळेत घेणे आवश्यक आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्र शोधण्यात वेळ घालवण्यापेक्षा, आधीच तयारी करून मतदानाला सर्वोच्च प्राधान्य देणे हे जागरूक मतदाराचे लक्षण आहे.

मतदादानाच्या दिवशी गोंधळ का उडतो याचे आत्मपरिक्षण करणे, हे देखील मतदारांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे.  आपले मतदान निश्चित करुन घेण्यासाठी स्वत:ही धडपड करणे आवश्यक असल्याची जाणीव नागरिकांमध्ये निर्माण करणे, हे आजच्या दिवशीचे महत्व आहे.  हा एक दिवस स्वातंत्र्य दिन, गणराज्य दिन, संविधान दिवस इतकाच महत्वाचा आहे. आत्मपरीक्षणाचा आहे. 

आजच्या काळात मतदार याद्यांमधील नावांचा गैरवापर, बोगस मतदान यांसारख्या अफवांविषयीही नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. आपले मत अमूल्य आहे. आपल्या नावाने कोणीही गैरवापर करू नये, यासाठी जागरूक राहणे हेदेखील मतदाराचे कर्तव्य आहे. खऱ्या अर्थाने मतदार दिन साजरा करणे म्हणजे केवळ कार्यक्रमात सहभागी होणे नव्हे, तर लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी सजग राहणे होय.  हा देश प्रत्येकाच्या मतांमधून घडतो.  लोकशाही मतदारातून उभी राहते. लोकशाहीला धर्म, पंथ, जात, भाषा, समुदाय, लिंग भेद मान्य नाही.  मतदान यंत्रलाही हा भेद समजत नाही.   आणि कोणताही मतदार दुय्यम नाही, हे समजून घेण्याचा दिवस म्हणजे भारतीय मतदार दिन.

केंद्र व राज्य शासनाने तसेच भारत निवडणूक आयोगाने मतदार दिन साजरा करण्यासंदर्भात विविध अधिकृत अध्यादेश, मार्गदर्शक सूचना आणि परिपत्रके जारी केली आहेत. या शासकीय दस्तावेजांचा केंद्रबिंदू एकच आहे—जबाबदार, सुजाण आणि सक्रिय मतदार घडवणे.

देशाचे सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता, अखंडता आणि एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी मतदार दिनाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मतांच्या संख्येवरुन देश घडतो.  ही संस्था संविधानाच्या रक्षणाची, अंमलबजावणीची जबाबदारी निश्चित करते.   कारण लोकशाही ही केवळ शासनाची व्यवस्था नाही, तर ती नागरिकांच्या सहभागातून जिवंत राहणारी जीवनपद्धती आहे. म्हणूनच, २५ जानेवारी हा दिवस प्रत्येक भारतीयाने आत्मपरीक्षणाचा दिवस म्हणून साजरा करावा—आपण आपल्या मताधिकाराचा योग्य वापर करतो का, आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण आपले कर्तव्य बजावतो का, याचा विचार करण्याचा दिवस.

निवडणूक आयोगाने मतदार होणे ही प्रक्रिया अतिशय सुलभ केली आहे. या संदर्भात अनेक ॲप्स उपलब्ध करण्यात आले आहे.ऑनलाइन पद्धतीने देखील नोंद करता येते.प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा निवडणूक कार्यालय बाराही महिने कार्यरत असते.या ठिकाणी तत्परतेने मतदार होण्यासाठी मदत केली जाते. त्यामुळे मतदार होणे ही फार कठीण प्रक्रिया नाही.यावर्षी देखील राष्ट्रीय मतदार दिन अतिशय उत्साहात देशभरात साजरा होत आहे.

शेवटी, हा देश आपला आहे आणि तो आपल्या मतातून घडतो.  ही भावना मनात ठेवून, प्रत्येक निवडणुकीत मतदान करणे हाच राष्ट्रीय मतदार दिनाचा खरा अर्थ आहे.

लेखक – प्रवीण टाके उपसंचालक (माहिती), विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर 9702858777.

and the duty of Indian citizens National Voters' Day
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleHind di chadar : हिंद-दी-चादर समागमासाठी नांदेड सज्ज
Next Article Water service : लोहा नगरपालिकेत ‘जलसेवा’चा शुभारंभ
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी

रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Social Forestry Department ; सामाजिक वनीकरण विभागात मैत्रीपूर्ण संबधासह सोयरपणातून चांगभल -NNL

December 27, 2024

Anti-Illegal Business : ‘अवैध व्यवसाय विरोधी अभियान -१’ तिसऱ्या आठवडयात आणखी 373 कारवाया, सुमारे साडेचार कोटींचा मुद्येमाल जप्त

May 26, 2025

Dcm Devendra Fadanvis : महाराष्ट्रात होणार आशियातील सर्वात मोठ्या माल्ट डिस्टिलरी प्रकल्पाची निर्मिती -NNL

October 10, 2024

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
Advertisement
टॉप बातम्या

Statement regarding pending demands : नांदेड जिल्यातील हिवताप व हत्तीरोग विभागातील आरोग्य कर्मचारी यांचा प्रलंबित मागण्या बाबत निवेदन

Com. Gangadhar Gaikwad : कॉ.गंगाधर गायकवाड यांना पोलीस संरक्षणाची गरज – कॉ.लता गायकवाड -NNL

Mahur fire house ; टाकळी येथे आगीची भीषण घटना; दोन घरं जळून खाक ; एकाचे अडीच लाखांचे तर दुसऱ्याचे तीस हजारांचे नुकसान -NNL

Kanba popalar ; श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे कानबा पोपलवार यांचा सत्कार

Chief Executive Officer Meenal Karanwal : राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेतील लाभार्थ्यांनी -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?