नांदेड| राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय संचालनालय पुणे, युवा कार्य व क्रीडा मंत्रालय भारत सरकार, उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र शासन मुंबई व राष्ट्रीय सेवा योजना विभाग स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय, राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथ संचलन पूर्व निवड चाचणी शिबिर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये दि. २६ ते २८ सप्टेंबर या दरम्यान विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहामध्ये यशस्वीरित्या संपन्न झाले.
या शिबिराच्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम.के. पाटील हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रमेश देवकर, डॉ. सुशील शिंदे, ओ. एस. डी. रासेयो मुंबई विद्यापीठ, रवींद्र खडकीकर प्रशासन अधिकारी मंत्रालय, कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सुरेखा भोसले, इंजिनीअर नारायण चौधरी, डॉ. शिवराज बोकडे, वित्त व लेखाधिकारी मो. शकील अब्दुल करीम, क्रीडा संचालक डॉ. भास्कर माने, डॉ. निखिल कारखानीस, डॉ. विजय विश्वकर्मा, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी यांची उपस्थिती होती.
या तीन दिवसीय शिबिराच्या काळात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी जे अनुभव घेतले ते अनुभव त्या स्वयंसेवकांनी व्यक्त केले. यामध्ये समीक्षा खेडकर मुंबई, अमोल सुर्वे, विवेक पिंजरकर, लक्ष्मीप्रिया मुरंकर, प्रणील सोनवणे, सिद्धी भामरे, प्रसाद मसल, भाग्यश्री नंद या स्वयंसेविकांनी मनोगत व्यक्त केले. संघ व्यवस्थापकामध्ये डॉ. जीवन विचारे मुंबई विद्यापीठ, प्रा. नितीन कराळे नागपूर, प्रा. गीता यादव नाशिक, डॉ. अर्चना काटकर संभाजीनगर, डॉ. नम्रता कांबळे कोल्हापूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
शिबिरार्थींना समारोप प्रसंगी डॉ. सुशील शिंदे व डॉ. रमेश देवकर यांनी मार्गदर्शन केले. शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांचा व संघ व्यवस्थापकांचा संयोजन समिती मधील सर्व कार्यक्रमाधिकारी यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या शिबिरास विशेष सहकार्य करणारे लेफ्टनंट डॉ. मुकुंद कवडे व लेफ्टनंट डॉ. किशोर इंगळे, थर्ड ऑफिसर सुनंदा नवशिंदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. केशव अलगुले यांनी तर सूत्रसंचालन डॉ. कल्पना कदम व डॉ. बालाजी होकरने यांनी केले. कार्यक्रमाचे आभार राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी यांनी केले.