नविन नांदेड| श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित इंदिरा गांधी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय सिडको नवीन नांदेड येथे २९ ऑगस्ट महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिन अर्थातच राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.


कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र-प्राचार्य डॉ. बी.एल.घायाळ हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक जनार्दन गुपिले,मलखांब प्रशिक्षक स. कुलदीपसिंग जट,पर्यवेक्षक प्रा.यु.सी. चंदेल, प्रा.शशिकांत हटकर,यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. बी. एल. घायाळ व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा शिक्षक डॉ. रमेश नांदेडकर यांनी केले. तर प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त क्रीडा शिक्षक जनार्दन गुपिले, म्हणाले की विद्यार्थ्यांनी हॉकीचे महान जादूगर मेजर ध्यानचंद यांचा आदर्श घेऊन खेळात प्राविण्य मिळवण्याबरोबरच अनेक स्पर्धात्मक परीक्षेत यश संपादन करावे. मेजर ध्यानचंद हे एक महान देशभक्त होते त्यांनी देशासाठी अनेक सुवर्णपदक जिंकून दिले. व या पुढील विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात त्यांच्या खेळांची प्रेरणा घेऊन वाटचाल करावी असे प्रतिपादन प्रमुख मार्गदर्शन करताना क्रीडा शिक्षक जे. ई .गुपिले यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एल.घायाळ म्हणाले की मेजर ध्यानचंद हे एक उत्कृष्ट महान हॉकीपटू होते. त्यांनी त्या काळात ऑलिंपिक स्पर्धेत सतत तीन वेळा सुवर्णपदक जिंकून दिले.अशा या महान हॉकीपटूच स्मरण करून आपल्या विद्यार्थ्यांनी जिल्हा राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक प्रकारच्या खेळात सहभागी होऊन आपलं नाव उज्वल करावं असं आवाहन त्यांनी यावेळी अध्यक्षीय समारोपात केले.
यावेळी प्रा.शशिकांत हाटकर, मलखांब प्रशिक्षक स.कुलदीपसिंग यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी सदरील कार्यक्रमात पवार सौरभ,हाडमोडे वैभव ,सुर्यवंशी खंडेश्वर,मडीलवाड या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाल्याबद्दल व नागेश बोंबले,सुप्रिया मोरे,साक्षी हनुमंते,अमोल सूर्यवंशी,मस्के सुप्रिया, प्रणाली जोंधळे,ओमकार मस्के,वृषाली उबाळे,भाग्यश्री हिंगोले, संजना ससाने,दीक्षा कांबळे, गायत्री सोळंके,शंकर चक्रधर,शिंदे बागेश्वरी, ढगे शिवानी,सावळे,कदम केतकी, ई खेळाडूंची विभागीय पातळीवर वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक प्राध्यापक डॉ. रमेश नांदेडकर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. रंजना अडकिने मॅडम यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. रमेश नांदेडकर, डॉ.अभिजीत खेडकर, डॉ.रंजना अडकिने, यांनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी प्रा.संजय देशमुख,प्रा. सातानुरे, प्रा.नितिन दारमोड, प्रा.विद्या काकडे, संजय अलसटवार, यांच्यासह महाविद्यालया तील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व असंख्य विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.