हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव शहरातुन जाणा-या राष्ट्रीय महामार्ग चे अर्धवट व संथगतीने होणा-या कामामुळे एकेरी वाहतुक व ‘धोकादायक बनलेले आहे. वारंगा ते महागाव 361 हे काम नेमके नव्याने कोणत्या एजन्सीने घेतलेले आहे. या बाबतीत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे.
वास्तविक पाहता ज्या एजन्सीने हे काम घेतलेले आहे. त्या एजन्सी कंपनीने सुचना फलक लावणे अवश्यक आहे. पण मुजोर एजन्सी ने अध्याप ही सुचना फलक लावले नाही. या वरुन हे कामकरणा-या एजन्सीच मुजोरपणा दिसुन येत आहे. गेल्या पाच वर्षापासुन वारंगा हदगाव ते गोजेगाव पर्यतचे अर्धवट कामामुळे अनेक अपघात झालेले आहेत. पण काम पुर्ण झालेले नाही ह्या अर्धवट कामामुळे राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी एकेरी वाहतुक असल्याने आपघाताच नेहमी धोका असतो. अनेक वाहने पलटी होत आहेत.
या राष्ट्रीय महामार्गावर सर्व प्रकारच्या वाहनाची नेहमी वर्दळ असते. शहरानजिक राष्ट्रीय महामार्गाचे काम संथगतीने होत असल्याने व या राष्ट्रीय महार्गावरच असख्य धाबे बिआरबार हाँटेल असल्याने रोडच्या वाहतूक सोबत दारुड्याची देखील रेलचेल या रोडवर असते. या मार्गावर चारचाकी व अवजड वाहने सुसाट वेगाने आसतात. टुव्हिलर वाल्यांना जीव मुठीत घेवून मध्यभागी किवा रोडच्या कठेला वाहने चालवावी लागत आहे, हे अत्यत धोकादायक असुन, हा रोड खालीवर असल्याने येजा करणा-या वाहनाना घसरण्याचा नेहमीच धोका असतो.
यामुळे अनेक अपघात होत असुन, अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ह्याला जबाबदार कोण..? असा संतप्त सवाल वाहनधाक करतांना दिसुन येत आहेत. या कामी राष्ट्रीय महामार्गच प्रशासन कमालीच बे-फिकर असुन, त्यांच्यावर कुणाच ही नियंत्रण नसल्याच दिसुन येत आहे. कारण ह्या राष्ट्रीय महामार्गावर आपघात झाल की, रुग्णाला हास्पीटल मध्ये आणयाच पोलिस पंचनामा करुन मोकळे होतात. हास्पीटल त्यांच्या रुग्ण आवक्या बाहेर असले की, ते लगेच नादेडला जा म्हणून मोकळे होतात. असा हा नित्याचाच कार्यक्रम झालेल आहे.
आमदार व खासदार यांनी लक्ष देणे गरजच
गेल्या पांच ते सात वर्षापासुन वारंगा हदगाव ते गोजेगाव क्र. 361 हा 30 किमी चा राष्ट्रीय महामार्ग रखडलेला आसतांना विद्यमान आमदार व खासदार रखडलेल्या व संथगतीने होणा-या व आपघातास निमंत्रण देणा-या या राष्ट्रीय मार्गाच्या बाबतीत आपले तोंड का उघडत नाही. असा संतप्त सवाल येथील विकासप्रेमी नागरिक करित आहे. प्रशासनाची मुजोरी व लोकप्रतिनिधीचा बे -फिकरपणा मुळे या राष्ट्रीय महामार्गावर नेहमी आपघाताची भिती आहे.