नांदेड l लिंगायत समाजातील ओबीसी वाणी या समाजाचे जात वैधता प्रमाणपत्र जाणून बुजून त्रुटीत टाकून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणाऱ्या समाज कल्याण विभाग कार्यालय नांदेड येथील कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखत करण्यात यावी ,अशी बसव ब्रिगेड यांच्या वतीने पदाधिकारी यांनी सहाय्यक आयुक्त,जात पडताळणी समाज कल्याण विभाग नांदेड यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.


दिलेल्या निवेदनात, कार्यालयातील सध्या चालू असलेला सावळा गोंधळ थांबवुन लिंगायत वाणी या जातीचे वैधता प्रमाणपत्रा साठी सर्व कागदपत्रे बरोबर देऊन सुद्धा आपल्या कार्यालपातीत काही कर्मचान्यांकडू सदरील संचिका चिरीमिरी साठीं त्रुटी मध्ये काढण्यात येत आहे,अर्जदारास स्वतः फोन करून सांगत आहेत की तुमची फाईल त्रुटी मध्ये आहे. मला येऊन भेटा मी तुमचे काम करून देतो


यामध्ये त्यांना नेमक काय साध्य करायचं आहे हे स्पष्ट कराव व सध्या चालू असलेला सावळा गोंधळ थांबविण्यात यावा,तसेच विद्यार्थ्यांची ऑफिस मधून होत असलेली पिळवणूक बंद करावी व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्या पासून थांबवावे, प्रमाणपत्र देण्यात विलंबामुळे एखाद्या जरी विद्यार्थीचे शैक्षणिक नुकसान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही आपल्या कार्यालयाची राहील, निवेदन देऊन कार्यालयात सुधारणा नाही झाल्यास सदरील चालू असलेला गौरख धंदा तात्काळ बंद न झाल्यास बसव ब्रिगेड तर्फे महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आल्या असून.


या वेळी नांदेड जिल्हा बसव बिग्रेडचे जिल्हा अध्यक्ष रत्नाकर कुराडे, नंदु येरगे, नांदेड शहर महानगर अध्यक्ष,नितीन चिंचोलकर जिल्हा सचिव,राजु बोंबले, उपाध्यक्ष कविराज केदारे व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष,कृष्णा पाटील भोसिकर, यांनी प्रत्यक्ष सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी नांदेड यांच्यी भेट घेऊन दिली आहे,निवेदनाच्या प्रती मंत्री, सामाजिक व न्याय विभाग, मंत्रालय मुंबई,आयुक्त, सामाजिक न्याय विभाग,छत्रपती संभाजीनगर , जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांना दिल्या आहेत.



