नवीन नांदेड l ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या हडको,पंकज नगर धनेगाव व मिल्लत नगर नांदेड या तिनं ठिकाणी घरफोडी करून सोने चांदी दागिने व नगदी रूपये चोरून नेणाऱ्या चोरट्यास अटक करून 56 हजार चारशे रूपये मुद्देमाल जप्त केला आहे.


या प्रकरणी पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत चोरी, घरफोडी, जबरी चोरी, दरोडा, यासारखे मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आनणे बाबत सर्व पोस्टे प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते.

त्या अनुषंगाने ओमकांत चिंचोलकर, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण यांचे मार्गदर्शना खाली पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथील गुन्हे शोध पथकातील पोउपनि. ज्ञानेश्वर मटवाड व त्यांची टिम दिनांक 27/06/2025 रोजी चोरी, घरफोडी गुन्हयातील पाहीजे फरारी आरोपी शोध व गुन्हेगार वाँच पेट्रोलींग कामी खाजगी वाहनाने करीत पेट्रोलींग करीत असताना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, चोरी, घरफोडी करणारा एक आरोपी धनेगाव बायपास ब्रिजखाली संशयीतरित्या थांबलेला आहे. अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने सदरची माहीती पो.नि.ओमकांत चिंचोलकर यांना देवुन मिळालेल्या माहीतीच्या ठिकाणी तात्काळ जावून तेथे थांबलेल्या एका संशयीत इसमास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अब्दुल अफताब अब्दुल अजीज वय 22 वर्ष व्यवसाय बेकार रा. अस्तान मस्जिदजवळ गाडेगाव रोड ता, नांदेड असे सांगीतले.


त्यास अधीक विश्वासात घेवुन पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण हद्दीत झालेल्या घरफोडी व चोरी संबंधाने विचारपुस केली असता त्यांने सांगीतले की, तो व त्याचा साथीदार मोहमद आमेर उर्फ पप्पु रा. मुखोद फंक्शन हॉल जवळ खुदबेनगर नांदेड असे दोघांनी मिळून पंकज नगर धनेगाव, हडको व मिल्लतनगर भागात लिन ठिकाणी घरफोडी केली आहे.

अशी माहीती दिल्याने त्याचेकडे कौशल्यपुर्ण तपास करुन त्याने व त्याचे साथीदारने मिळुन केलेल्या वर नमुद गुन्हयांतील चोरी केलेले नगदी रुपये व सोन्याचे व चांदीचे दागीने असा एकूण 56400/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या कामगीरीचे वरीष्ठांनी अभिनंदन केले असून या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकांचे उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मठवाड,पोहे का सुनिल गटलेवार, केंद्रे,पंचलिग, कल्याणकर,माने, आवळे, यांनी केला आहे.

