नांदेड| निसर्गाचे संवर्धन आणि संगोपनाची परंपरा यात्रा जपणारी नागदेवतेची सातशे वर्षाची परंपरा असलेली यात्रा नागपंचमीनिमित्त भरवल्या जाते नांदेडच्या कंधार तालुक्यातील गुंडा नागवडी येथे नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची मोठी यात्रा भरली जाते. या यात्रेत हजारो वर्षाची परंपरा आहे या यात्रेसाठी भाविक पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने उपस्थित असतात. दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा अशी ओळख असलेल्या माळेगाव यात्रेनंतर आता एक दिवसीय सर्वात मोठी यात्रा ही नागबर्डी येथे नागपंचमीच्या दिवशी भरल्या जाते
मंदिराची 700 वर्षाची परंपरा काय आहे आख्यायिका सातशे वर्षाची परंपरा असलेली ही यात्रा का भरवली जाते यावर येथील ग्रामस्थांनी आपले प्रतिक्रिया नोंदवले. बाहेर देशातून बहीण भाऊ उदरनिर्वाह करण्यासाठी कंधार तालुक्यातील दिंडी गुंडा दिंडी या गावात परिसरात फिरत ते नागबर्डी मार्गावनावर येऊन एका मालकाचे जनावरे चारत होते. यावेळी नागोबाच्या वारुळाला भावाने चार ते पाच खड्डे मारले. यातील नागराज जागृत होऊन बाहेर आले व त्या भावाला नागदेवतेचा चावा घेतला त्यानंतर बहिणीने तेथील असलेल्या त्या ठिकाणी असलेल्या लिंबाच्या झाडाचा पालाव रस भावाला पाजल्यानंतर तो जिवंत झाला अशी अख्यायिका आहे.
त्यामुळे या परिसरातील भाविक लिंबाचे झाड उगवले तर ते तोडत नाहीत झाड तुटून जरी गेले आणि वाळून जरी पडले तरी त्याला कोणी हात लावत नाही किंवा फांदी देखील तोडत नाही. नागदेवता या लिंबाच्या झाडा परिसरात असून तो भाविकांना आशीर्वाद देईल अशी आख्यायिका मागील अनेक वर्षापासून आहे. यामुळे या परिसरात लिंबाचे झाड तोडत नाहीत. नागपंचमीला या परिसरात असंख्य साप परिसरात लिंबाच्या झाडा परिसरात आढळून येतात पण भाविक न घाबरून जाता त्यांचे दर्शन घेऊन नागपंचमी साजरी करतात लिंबाच्या झाडा परिसरात नाग असतात त्यामुळे आपण तेच हाडे तोडच नाही अशी भाविकांची प्रतिक्रिया दिली.
गावचे पोलीस पाटील नागेश शिंदे यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली. त्यामुळे गुंडा नागबर्डी येथे सातशे वर्षाची परंपरा असलेली नागराजाची यात्रा निसर्गाचे संवर्धन आणि संगोपन करणारे देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. तीर्थक्षेत्र विकास योजनेतून विकास कामे केली जात असून या ठिकाणी पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणार असल्याचे देवस्थानाचे पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली. प्रत्येक गावच्या घरातील एक व्यक्ती या नागबर्डी देवस्थानासाठी दर्शनाला या यात्रेसाठी परिसरातील भाविक देश विदेशातून कामाला गेलेले तरीसुद्धा ते आवर्जून यात्रेसाठी येत असतात भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी पाहायला मिळते.