HomeनांदेडSiege and dam on Himayatnagar Nagar Panchayat : माकप,सीटू आणि लोकविकास संघर्ष...

Siege and dam on Himayatnagar Nagar Panchayat : माकप,सीटू आणि लोकविकास संघर्ष समितीचे हिमायतनगर नगरपंचायतवर घेराव आणि धरणे -NNL

हिमायतनगर| मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, सीटू आणि लोकविकास संघर्ष समितीच्या वतीने विविध मागण्यासाठी हिमायतनगर नगरपंचायत येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. ९ ऑगस्ट क्रांतिदिनी देशभर विविध पक्ष संघटनेच्या वतीने आंदोलने केली जातात. स्थानिक आणि प्रलंबीत मागण्याची पूर्तता करावी म्हणून ऐन नाग पंचमीच्या दिवशी सनासुदीत शेकडो महिला आक्रमकपणे नगर पंचायत मध्ये घुसल्या.

IMG 20240809 WA0068 Siege and dam on Himayatnagar Nagar Panchayat : माकप,सीटू आणि लोकविकास संघर्ष समितीचे हिमायतनगर नगरपंचायतवर घेराव आणि धरणे -NNL

जॉब कार्ड,घरकुल,रेशन कार्ड देण्यात यावे.मनरेगाची कामे शहरात सुरु करावीत.मागील २० ते २५ वर्षांपासून घरे बांधून शहरात राहतात त्यांना मालकी देण्यात यावी. आदी मागण्याचे निवेदन मुख्याधिकारी रणदिवे यांना देण्यात आले होते. पुढील दहा दिवसात जॉब कार्ड आणि काम उपलब्ध करून देण्याचे आश्वासन नगर पंचायतच्या वतीने दिले आहे. दहा दिवसात आश्वासनाची पूर्तता झाली नाही तर न्यायालयात ओढणार आणि दाद मागणार असा इशारा जेष्ठ कामगार नेते कॉ. विजय गाभने यांनी क्रांती दिनी दिला.

IMG 20240809 121949 Siege and dam on Himayatnagar Nagar Panchayat : माकप,सीटू आणि लोकविकास संघर्ष समितीचे हिमायतनगर नगरपंचायतवर घेराव आणि धरणे -NNL

आंदोलन यशस्वी करण्यासाठी तालुका अध्यक्ष कॉ.दिगंबर काळे, जयश्री बीजेवार,गणेश रचेवार आदींनी प्रयत्न केले तर किसान सभेचे नेते कॉ. अर्जुन आडे, सीटू राज्य सचिव कॉ.उज्वला पडलवार, जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड, बांधकाम संघटनेचे अध्यक्ष कॉ.दिलीप पोतरे आदींनी पाठिंबा देत आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी परमेश्वर मंदिर परिसरातून मोर्चा काढून नगर पंचायत येथे चार तास घेराव घालून जोशपूर्ण घोषणाबाजी करण्यात आली. अशी माहिती सीटूचे जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड यांनी दिली आहे.

IMG 20240809 125331 Siege and dam on Himayatnagar Nagar Panchayat : माकप,सीटू आणि लोकविकास संघर्ष समितीचे हिमायतनगर नगरपंचायतवर घेराव आणि धरणे -NNL
 

IMG 20240809 121614 Siege and dam on Himayatnagar Nagar Panchayat : माकप,सीटू आणि लोकविकास संघर्ष समितीचे हिमायतनगर नगरपंचायतवर घेराव आणि धरणे -NNL

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments