Siege and dam on Himayatnagar Nagar Panchayat : माकप,सीटू आणि लोकविकास संघर्ष समितीचे हिमायतनगर नगरपंचायतवर घेराव आणि धरणे -NNL
हिमायतनगर| मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, सीटू आणि लोकविकास संघर्ष समितीच्या वतीने विविध मागण्यासाठी हिमायतनगर नगरपंचायत येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. ९ ऑगस्ट क्रांतिदिनी देशभर विविध पक्ष संघटनेच्या वतीने आंदोलने केली जातात. स्थानिक आणि प्रलंबीत मागण्याची पूर्तता करावी म्हणून ऐन नाग पंचमीच्या दिवशी सनासुदीत शेकडो महिला आक्रमकपणे नगर पंचायत मध्ये घुसल्या.
जॉब कार्ड,घरकुल,रेशन कार्ड देण्यात यावे.मनरेगाची कामे शहरात सुरु करावीत.मागील २० ते २५ वर्षांपासून घरे बांधून शहरात राहतात त्यांना मालकी देण्यात यावी. आदी मागण्याचे निवेदन मुख्याधिकारी रणदिवे यांना देण्यात आले होते. पुढील दहा दिवसात जॉब कार्ड आणि काम उपलब्ध करून देण्याचे आश्वासन नगर पंचायतच्या वतीने दिले आहे. दहा दिवसात आश्वासनाची पूर्तता झाली नाही तर न्यायालयात ओढणार आणि दाद मागणार असा इशारा जेष्ठ कामगार नेते कॉ. विजय गाभने यांनी क्...
