उस्माननगर l उस्माननगर परिसरातील ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच उद्योजक , व्यापारी , सामाजिक कार्यकर्ते यांचा मुस्लीम बांधवांच्या वतीने उस्माननगर येथील जामा मस्जिदचे प्रमुख साजीदभाई काजी यांच्या कडून दिपावली निमित्त शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला.


भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण ही केवळ धार्मिक प्रथा नसून, ती समाजाच्या चेतनेचे प्रतिबिंब असते. उस्माननगर परिसरात सर्व धर्मांतील लोक एकत्र येऊन सण उत्सव साजरा करतात. रमजान ईद ला हिंदु बांधव मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतात आणि हिंदू समाजात साजरे होणाऱ्या अनेक सणाच्या निमित्ताने भेट देऊन शुभेच्छा देण्याची परंपरा आहे.


दिवाळी हा केवळ एक धार्मिक विधी नाही तर कुटुंब आणि समाजात सुसंवाद, सहकार्य आणि सद्भावना वाढवण्याची आहे. उस्माननगर येथील जामा मस्जिद चे प्रमुख साजीद भाई काजी , माजीद काजी साहेब सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सरपंच प्रतिनिधी आमीनशा फकीर , इं. जमीलसाब शेख , बाबु पिंजारी पानपट्टी वाले , मौलवी बाबु पिंजारी , शेरू आदमनकर , मुखीद मौलाना , जावेद मौलाना, यांच्या सह अनेक मुस्लिम बांधवांकडून या परिसरातील भाजपाचे राष्ट्रीय सदस्य तथा माजी सरपंच.


ज्येष्ठ कार्यकर्ते तुकाराम वारकड गुरूजी , माजी सभापती तथा कंधार भाजपाचे उत्तरचे अध्यक्ष बालाजी माधवराव पांडागळे , शिराढोण चे सरपंच खुशालराव पांडागळे , तेलंगवाडीचे सरपंच प्रतिनिधी तथा आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे समर्थक , सामाजिक कार्यकर्ते सुरेश मामा बास्टे , गणपतराव देवणे गुरूजी , माजी उपसरपंच शिराढोणचे साईनाथ पाटील कपाळे , दहीकळंबा येथील सरपंच प्रतिनिधी अवधूत पाटील शिंदे , उस्माननगर येथील सरपंच प्रतिनिधी माणिक काळम , चेअरमन तथा ग्रामपंचायत सदस्य संजय वारकड , पत्रकार गणेश लोखंडे , यांच्या सह अनेक व्यापारी, उद्योजक , कार्यकर्ते यांना दिपावली निमित्त शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला.



