नवीन नांदेड| नांदेड तालुक्यातील गोपाळचावडी ग्रामपंचायत सरपंच पदासाठी सौ सुरेखा लाखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. श्रीमती गिरिजाबाई डाकोरे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला नंतर तब्बल एक महिन्याच्या कालावधी नंतर नवीन सरपंच पदासाठी दि १४ ऑगस्ट रोजी निवडणूक झाली यावेळी सरपंच पदासाठी सौ. सुरेखा लाखे यांच्या एकच अर्ज आल्यामुळे दुपारी २ वाजता बिनविरोध निवड करण्यात आली .


पंच वार्षिक निवडणूकीत गेल्या अडीच वर्षा पूर्वी नवचैतन्य ग्रामविकास पॅनल चे प्रमूख साहेबराव सेलुकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या निवडणूकी मध्ये आकरा पैकी आकरा जागा एकतर्फी निवडुण विजय मिळवला होता,व सरपंचपदाचे आरक्षण एस.सी.महिला साठी आरक्षीत असल्याने पहिल्या अडीच वर्षासाठी श्रीमती गिरिजाबाई डाकोरे यांची सरपंच पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली होती.


अडीच वर्षे कालवधी झाल्यानंतर ठरल्या प्रमाणे खांदेपालट करण्यासाठी सरपंच डाकोरे यांनी राजीनामा दिल्यानंतर १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालय गोपाळचावडी येथे पिठासीन अधिकारी तथा मंडळ अधिकारी एच, एन ,,सुजलेगावकर , तलाठी रामेश्वर भिंगोरे व ग्रामविकास अधिकारी पि.डी.उबाळे यांच्या उपस्थितीत विशेष सभा घेऊन दि १४ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता नव्याने सरपंच पदासाठी निवड झाली असून या निवडीचे सुचक उपसरपंच साहेबराव पाटील सेलुकर यांनी नाव सुचवले तर या नावावर सर्व सदस्यांनी सर्वानुमते बिनविरोध सौ सुरेखा प्रदीप लाखे यांची सरपंचपदी निवड करण्यात आली .


यावेळी ग्राम पंचायत सदस्य अशोकराव अंकुलवार ,नितिन कंधारे ,हनमंत मैलगे, छायाबाई खटके ,कवीताताई कतुरे ,मयूरी नायगावे, यांच्या सह सदस्य उपस्थित होते, तर ग्राम पंचायत सदस्य प्रतिनिधी अनिल धमने ,नवनाथ डाकोरे पोलीस पाटील प्रतिनिधी विजय खटके ,रमेश तालीमकर, कर्मचारी आर्शीवाद डाकोरे शाखीर शेख ,सना सय्यद ,अशोक बनसोडे, यांच्या सह ग्रामस्थांची उपस्थिती होती. बिनविरोध निवड नंतर सरपंच सौ. लाखे यांच्या सत्कार सदस्य व मित्र परिवाराने केला, निवडणुक दरम्यान ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अमलंदार जि,एच.तेलंगे ,व्हि.बि .केंद्रे ,यांच्या सह चार होमगार्ड यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.



