नवीन नांदेडl आगामी होणा-या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री होण्यासाठी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी हडको भागातील नवसाला पावणारा शिव गणेश मंदिरात विधीवत पुजन करून श्री फळाचे तोरण बांधत साकडे घेतले यावेळी महाराणा प्रताप गणेश मंडळ येथे महाआरती केली.
गणेशोत्सव निमित्ताने ११ सप्टेंबर रोजी नांदेड दक्षिण आमदार मोहनराव हंबर्डे यांनी हडको भागातील नवसाला पावणारा शिव गणेश मंदिरात विधीवत पुजन, महा अभिषेक,करून आगामी विधानसभा निवडणुकीत पुनश्च महा विकास आघाडीच्या मुख्यमंत्री होण्यासाठी गणपतीदेवाला साकडे घालून श्री फळाचे तोरण बांधले, यावेळी ॲड जे पी.पाटील,माजी नगरसेविका डॉ. करूणा जमदाडे,ज्योती कदम, भारतीय कामगार सेनेचे जिल्हा अध्यक्ष ब्रिज लाल उगवे, गोल्डी जमदाडे, राम देशपांडे, संभाजी पाटील बेटमोगरेकर, एस.पी. कुंभारे,उपस्थित होते. महाराणा प्रताप गणेश मंडळ अध्यक्ष बंजरग ठाकुर, प्रविण शिंदे, विरेन ठाकूर, प्रेम पवार, कृष्णा बयास,यांनी आ.हंबर्डे यांचा सत्कार करून शिव गणेश प्रतिमा भेट दिली.यावेळी परिसरातील महिला व नागरिकांनी पेव्हर ब्लॅक करून देण्याची मागणी केली असता करून देण्याचे आश्वासन यावेळी दिले.